You are here
Home > महाराष्ट्र > धक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता ?

धक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता ?

स्थानिक पातळ्यांपासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जणू टीआरपी व जास्त views मिळविण्यासाठी खोट्या बातम्या पसरविल्या जातात कां ? याबाबत चर्चेला उधाण, मात्र , दोषी प्रसारमाध्यमांवर व्हायला हवी कारवाई !

लक्षवेधी :-

देशातील प्रसारमाध्यमे सरकारच्या तालावर नाचत असतांनाच आता ती चुकीच्या बातम्या पसरवून व जनतेला संभ्रमात ठेवून जनतेलाch जणू नाचवत आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे खोटे बोलून सत्तेत आले आणि आता आपली पोल खुलु नये म्हणून प्रसारमाध्यमांना जाहिराती आणि आर्थिक पैकेज देवून आपला उदोउदो करून घेण्याचे नाटकीय खेळ प्रसारमाध्यमांतून ते खेळत आहे, ते देशासाठी खूप घातक असून देशातील अग्रणी व्रुत्त वाहिन्या ह्या कित्तेक खोट्या बातम्या दिल्यानंतर त्यांच्या संपादकानी जाहीर माफी सुद्धा मागीतली आहे पण त्यामुळे सर्वसामान्य माणुस आज संभ्रमात आहे. कारण कोरोना सारख्या भयानक महामारी मधे सर्व भारतीय जनता एकत्र येवून लढण्याची गरज असतांना पंतप्रधानांच्या अंधभक्तांनी देशात जणू हिंदू मुस्लिम हा व्हायरस पसरविण्याचे छडयंत्र चालविले आहे. मात्र त्यामधे सर्वात पुढे आहे ते न्यूज चैनेल, जे दररोज खोट्या बातम्या पसरवून देशातील जनतेला या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लावलेल्या संचारबंदीत सुद्धा हिंदू मुस्लिम वादात टाकत आहे.ज्यावर देशातील पंतप्रधान यांच्या कार्यालयातून कुठलाही अंकुश नाही, हे स्पष्ट दिसून येते.

पंतप्रधानांच्या १४ एप्रिलच्या भाषणात त्यांनी म्हटले होते की आम्ही जानेवारीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला तेंव्हाच बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिन्ग सुरू केली होती, मात्र परिस्थिती याविपरीत होती. कारण फेब्रुवारीला अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम आले होते, त्यांचे गुजरात मधे हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असतांना भव्य स्वागत झाले कसे ? त्यानंतर मध्यप्रदेश मधे काँग्रेस सरकार पाडून भाजपच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा समारोह झाला जेव्हा की कोरोना व्हायरसचे भारतात रुग्ण वाढले होते मग त्यावेळी सोशीयल डिस्टेन्स हा नियम पाळला कां गेला नाही ? आणि जेव्हा केंद्र सरकारच्या हातात पासपोर्ट, विजा देणे आणि विमानतळ सोबतच सेंट्रल पोलिस असतांना विदेशातील नागरिक भारतात आले त्याची वैद्यकीय चाचणी कां करण्यात आली नाही ? दिल्लीत तबलीगी जमात चा कार्यक्रम मार्च महिन्यात होता त्या कार्यक्रमाला विदेशातून व भारतातील प्रत्त्येक प्रांतातून नागरिक इथे दिल्लीत आले त्यांच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांप्रमाणे परवानगी कां नाकारली नाही ? आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या तबलीगी जमात वर अंधभक्त व शासन आरोप करीत आहे की तबलीगी जमात यांचा पाकिस्तानी खेळ आहे तर निजबुद्दिन मधून जो तबलीगी समाजातील लोक बाहेर पडले त्याचंवेळी त्यांना तिथेच टेस्ट करून कोरोनटाईन कां करण्यात आले नाही ? अशा प्रकारचे प्रश्न प्रसारमाध्यमांनी सरकारला विचारायला हवे असतांना प्रसारमाध्यमे सुद्धा तबलीगी जमात ला लक्ष करून हिंदू मुस्लिम हा विषय रंगवीत असल्याने ही प्रसारमाध्यमे सरकारचा खुला एजेंडा वापरताना दिसत आहे.
देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ होत असतांना टिव्ही न्यूज चैनेल मधे त्यावर सरकारला घेरणे व सरकारच्या कमजोर बाजूला उजागर करून देशातील जनतेला दिलासा मिळेल अशा प्रकारचे काम सरकारकडून करून घेणे अपेक्षित असतांना न्यूज चैनेल सरकार विरोधात काही न बोलता उलट विरोधी पक्षाच्या भूमिकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनाच लक्ष करतांना दिसतात त्यामुळ प्रसारमाध्यमांची विश्वसनीयता आता राहिली नसल्याने कोणत्या बातमी वर विश्वास ठेवायचा ? हा प्रश्न जनतेला पडला आहे. नुकतेच एबीपी माझा न्यूज चैनेल ने एक नाहीतर दोन बातम्या चुकीच्या प्रसारित करून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. त्यापैकी मुंबई वरून रेल्वे गाड्या १४ एप्रिलला धावणार अशी बातमी होती. त्या बातमीने हजारो परप्रांतीय लोक मुंबई च्या बान्द्रे रेल्वे स्टेशन वर जमा झाले व संचारबंदी चे नियम पायदळी तुडविल्या गेले, एवढेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही नसतांना तिथे दिनांक १३ एप्रिलला एबीपी माझा ने पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी देवून चंद्रपूर च्या जनतेला संभ्रमात टाकले होते, दिनांक १७ एप्रिलला दैनिक लोकमत मधे कोरोना चे तीन रुग्ण चंद्रपूर मधे असल्याची बातमी देण्यात आली व पुनः चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे स्थानिक काही प्रसारमाध्यमांनी सुद्धा चुकीच्या बातम्या पसरवून एक प्रकारे जनतेचा संताप वाढविण्यास मदतच केली आहे. त्यामुळे जर जनतेपर्यंत माहीती पोहचवीणारी माध्यमे अशा खोट्या बातम्या देत असतील तर जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर ? हा प्रश्न चिंतनीयबनला आहे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर करवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा