You are here
Home > महत्वाची बातमी > मोदीजी , तुम्ही देशवासीयांना खरोखरंच मूर्ख बनविले !

मोदीजी , तुम्ही देशवासीयांना खरोखरंच मूर्ख बनविले !

लक्षवेधी :-

खरं तर ही लक्षवेधी लिहिण्याचा प्रपंच ह्यासाठी करावा लागत आहे की आजची कोरोना संकटाची स्थिती बघितली तर ती भयावह तर आहेच पण यानंतर जेव्हां लॉक डाऊन हटेल आणि लोक आपापल्या कामाला लागतील तेंव्हा ही स्थिती आणखी भयावह झालेली असेल असेच एकूण सर्वेक्षणाअंती चित्र दिसत आहे. आणि या स्थितीला सर्वात मोठे जबाबदार असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, कारण यांना अगोदर नोटाबंदीचा झटका आला आणि त्यानी नोटाबंदी केली, त्याचा परिणाम काय झाला ? तर मोदी सरकारने नोटाबंदी नंतर उदभवनाऱ्या स्थितीचे कुठलेही आकलन न करता, आढावा न घेता व कुठलीही तयारी न करता नोटाबंदी करून टाकली, त्याचा परिणाम हा झाला की बैंक समोर रांगा लावून तब्बल १०० लोकांपेक्षा जास्त लोक मरण पावले, आणि साध्य काय झालं ? तर रिझर्व बैंक तर्फे सांगण्यात आलं की चलनातील तब्बल ९९.९३ टक्के पाचशे आणि हजार च्या नोटा बैंकेत म्हणे जमा झाल्या, तर मग नोटाबंदीचा निर्णय घेवून साध्य काय केलं ? अर्थात काहीही नाही, फक्त या काळात भाजपच्या नेत्यांचा संपत्तीत मोठी वाढ झाली आणि देशातील लाखो लोकांचा एकाचवेळी रोजगार गेला, त्यातून देश सावरत नाही तोच पुन्हा मोदींनी जीएसटी लागू करून देशांतर्गत मोठी आर्थिक कोंडी निर्माण केली आणि देशाचा विकास दर हा माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी सांगितल्या प्रमाणे तो दोन टक्क्यांनी घसरला, पण यांना त्याचे काहीएक घेनेदेने नसल्याप्रमाणे त्यानी त्यांचे अयशस्वी प्रयोग सुरूच ठेवले आहे आणि आता कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशात घेतलेला लॉक डाऊन चा निर्णय सुद्धा तसाच कुठलीही तयारी न करता व कुठल्याही परिस्थितीचे भान न ठेवता घेतल्या गेला आहे, त्यामुळे भारतातील किमान एक कोटी जनतेला या त्या प्रांतात आणि जिल्ह्यात अडकून मरण यातना भोगाव्या लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ हा अत्यंत वाईट आणि या देशाला जागतिक स्थरावर बदनामी करणारा ठरला, कारण त्याचे एकच उदाहरण द्यायचे झाल्यास जर गूगल वर फेकू शब्द टाईप केला तर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव यायचे, म्हणजे भारतातील जनतेने त्यांना जणू फेकू ही उपाधी देवून सन्मानित केले जे अत्यंत वाईट आणि देशाला असा फेकू पंतप्रधान मिळाल्याचे दूर्भाग्य आहे.
पण आता सुद्धा परिस्थिती बदललेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की भारतात कोरोना चा पहिला रुग्ण हा ५ जानेवारीत मिळाला तेव्हापासून आम्ही सतर्क आहोत, तर मग जर ५ जानेवारी पासून विमानतळ व्यवस्था तूम्हचे कडे होती आणि आपणच सांगताय की विदेशातून आलेल्या भारतीय किंवा विदेशी नागरिक यांची स्क्रिनिन्ग सुरू केली, खरं तर यांच्याकडे विदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहीती असतांना परदेशातून डिसेंबर ते मार्च या दरम्यान जवळपास ३० ते ४० लाख लोक विदेशातून आले त्या लोकांची चाचणी केली असती आणि त्यातील संशयित रुग्णांचे विलगिकरण केले असते तर आज १३० कोटी भारतीयांवर संचारबंदीमुळे घरातच अडकून पडण्याची वेळच आली नसती, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली आहे.आतपर्यंत काही हजार लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या. पण तेव्हाच जर परदेशातून आलेल्या लाखो प्रवाशांना विलगीकरणात ठेवले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती, असेही डॉ.बंग म्हणाले आहे,

केंद्र सरकारने उपलब्ध पर्यायातून टाळेबंदीचा पर्याय सर्वोत्तम म्हणून निवडला असला तरी काही तज्ज्ञांच्या मते हा काही ठोस पर्याय नाही. महत्वाचे म्हणजे आपण जेवढ्या जास्त तपासण्या करू तेवढे जास्त कोरोना रुग्ण आपल्याला सापडतील आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर रुग्णांचा शोध लागेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण डॉक्टरांना होऊ नए म्हणून पीपीई, मॉस्क आणि हँडक्लोज पुरेसे उपलब्ध न करता व वैद्यकीय तांत्रिक बाबी उपलब्ध न करता जे थाळ्या वाजवणे आणि दिवे लावण्याचे इवेंट्स साजरे केले ते भारतीय जनतेला मुर्खाच्या नंदनवनात फिरावंण्यासारखे आहे. त्यामुळे टाळेबंदीमुळे खरोखर किती फायदा झाला, हे तपासण्यासाठी ठोस आधार नसला तरी देशात मोठ्या प्रमाणात वाढलेले कोरोना रुग्ण हे मोदी सरकारच्या नाकर्त्यापणाचे लक्षण आहे हे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे मोदींनी देशातील जनतेला मूर्ख बनविले हे जाहीर होत आहे, मात्र अंधभक्त यांना मोदी नामाचा कावीळ झाला असल्याने त्यांना देशाच्या बर्बादीत सुद्धा देशाचा विकास झाल्याचा साक्षात्कार होतो एवढे मात्र नक्की.

2 thoughts on “मोदीजी , तुम्ही देशवासीयांना खरोखरंच मूर्ख बनविले !

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा