You are here
Home > कोरपणा > सिमेंट वाहतुकीमुळे नागरिकात दहशत अनेक गावात असंतोषाचा भडका.

सिमेंट वाहतुकीमुळे नागरिकात दहशत अनेक गावात असंतोषाचा भडका.

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

जिल्हा चंद्रपूर जिल्हा कोरोना संक्रमणापासून वंचित असल्याचा आनंद नागरिकांमध्ये असताना लोकप्रतिनिधी शासन-प्रशासन यांच्या आव्‍हानावरुन ग्रामीण भागातील गावागावात संचारबंदी, लॉक डाऊन व सीमा बंदी करून नियमांचे पालन नागरिक करत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यातील हजार चे वर कामगार ऊस तोडी , गहू चना कटाई साठी अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने कठोर निर्देश देऊन जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे नागरिक समाधानी होते. मात्र शासनाने कोरपना तालुक्यातील नामांकित सिमेंट कंपनी माणिक गड, अल्ट्राटेक , अंबुजा या सिमेंट कंपन्यांना उत्पादन व वाहतुकीची मंजुरी दिल्याने संचारबंदी, सीमा बंदी, लॉक डाऊन इत्यादी नियमाचा फज्जा उडाला आहे. 26 मार्च पासून शिस्तीत असलेले व पोलीस कार्यवाही ने बसलेला आळा तीन दिवसात कोलमडले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रेड झोन मध्ये असलेला मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा व पुणे-मुंबई भागातील या वाहतुकीमुळे अडलेल्या कामगार, वाहतूक चालक यांच्या मार्गाने कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. शासनाने घेतलेला निर्णय स्थगित करावा, सिमेंट वाहतूक रेल्वेमार्गाने करावी, यासाठी तहसीलदार वाकलेकर साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री, जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना वाहतूक बंद करण्याचे निवेदन जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अाबीद अली, शेतकरी नेते पुरुषोत्तम आस्वले, काँग्रेस चे विजय पिंपळशेंडे, वंचित बहुजन आघाडीचे विजय जीवणे यांनी निवेदन देऊन मागणी केली. यावेळी तालुक्यातील सीमेवरील गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी यांच्या भावना तीव्र झाले असून भोयागव,वनोजा, कोडसी, परसोडा इत्यादी गावकऱ्यांनी बाहेर गावातून येणारे वाहन तालुक्यात येऊ देणार नाही व जिल्हा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन केल्याचे चित्र दिसत आहे. ‘मुख्यमंत्री साहेब आम्हाला सुरक्षित राहू द्या हो’ असे यावेळी बोलून दाखवले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा