You are here
Home > चंद्रपूर > सणसणीखेज :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात कोळसा माफिया सोबत पत्रकारांची होणार पोलिस चौकशी ?

सणसणीखेज :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात कोळसा माफिया सोबत पत्रकारांची होणार पोलिस चौकशी ?

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार गेल्याने कोळसा माफियांचे धाबे दणाणले ?

कोळसा चोरी भाग – ९

पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणाची चौकशी आता गडचांदूर पोलिस करीत असली तरी अजूनपर्यंत मुख्य आरोपीला पोलिस पकडू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशातच घूग्गूस येथील स्थानिक पत्रकार दया तिवारी व मनोज कनकम हे या प्रकरणाची मुख्य कडी असून त्यांचा या कोळसा चोरी प्रकरणात काय सहभाग आहे ? याबाबत गडचांदूर पोलिस लवकरच त्यांना गडचांदूर पोलिस स्टेशन मधे बोलावणार असल्याची माहीती स्वतः तपास करणारे पोलिस अधिकारी शकील अन्सारी यांनी दिली आहे. मात्र कोळसा माफिया यांचे कडून या पत्रकारांनी घेतलेली रक्कम याबाबत एक विडिओ व्हायरल झाला असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

पैनगंगा कोळसा चोरी प्रकरण हे वेकोली घूग्गूस कोळसा सायडिंग वरून तयार झाले असून येथील काटा बाबू आणि कोळसा खाली केल्याबाबत पावती देणारा खाजगी कर्मचारी हा दोषी आहे, अर्थात या महत्वाच्या ठिकाणी खाजगी कंपनी चा कर्मचारी हाच कोळसा चोरी प्रकरणातील महत्वाचा दुवा आहे, कारण ज्या तीन ट्रक कोळशाच्या गाड्या कोळसा खाली न करता बाहेर गेल्या, तरी त्या गाड्यांची रिटर्न पावती ट्रक ड्रायवर यांना दिली गेली असल्याची बाब उघड झाल्याने वेकोली कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्या खेरीज वेकोली चा कोळसा बाहेर जाऊच शकत नाही, हे सत्य आता समोर आलं आहे. परंतु पोलिसांचा तपास हा त्या दिशेने जात नसल्याने ही कोळसा चोरी मुळात कुणाच्या इशाऱ्याने झाली याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा अशी वेकोली वर्तुळात चर्चा आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे हे प्रकरण गेल्यामुळे कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे, मात्र या प्रकरणी पोलिसांचा योग्य तपास न झाल्यास हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग केल्या जाईल अशी शक्यता आहे. मात्र यानंतर सुद्धा जर या प्रकरणाचा छडा लागला नाही आणि मुख्य आरोपींचा शोध लागला नाही तर महिन्या काठी कोट्यावधी रुपयाच्या या व अशाच संभावित कोळसा चोरी प्रकरणाची सूत्रे ही  सीबीआई यांच्याकडे तपासा करिता जाण्याची दाट शक्यता आहे …

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा