You are here
Home > कृषि व बाजार > बनावट टेस्टिंग रिपोर्ट प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच

बनावट टेस्टिंग रिपोर्ट प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच

ओम श्री.ट्रेडिंग च्या संचालिका नीता सिंघवी यांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची पत्रपरिषदेतून मनसेचे राजु कुकडे यांनीं केली मागणी. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन.

चंद्रपूर- जिल्हा परिषदमधे सध्या बनावट टेस्टिंग रिपोर्टच्या आधारावर कोट्यावधी रुपयाचा निविदा घोटाळा गाजत आहे.या प्रकरणी मनसेचे राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून कोट्यावधीच्या या घोटाळ्याची सी.आई.डी मार्फत चौकशी करून दोषी कंत्राटदारावर करवाई करून त्यांच्या कंत्राटी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. परंतु मागील एक महीना लोटून सुद्धा या प्रकरणी कोणत्याही आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे शासकीय कार्यलयात साहित्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला टेस्टिंग रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे. त्या शिवाय साहित्याची गुणवत्ता कळणार नाही असा नियम आहे.परंतु निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा करून चांगल्या दर्जाचे साहित्य आहे असे दाखविण्यासाठी बनावट टेस्टिंग रिपोर्ट तयार करून कोट्यावधीच्या साहित्य खरेदीत कमिशनखोरी केल्या जाते.यामधे ओम श्री ट्रेडिंग कंपनीच्या संचालिका नीता सिंघवी यांच्यावर सुद्धा रामनगर पोलीस स्टेशन मधे गुन्हे दखल असतांना त्यांना पोलीस का अटक करीत नाही ? हा महत्वाचा प्रश्न असून त्यांच्यामागे राजकीय ताकत असल्याने व सत्ताधारी यांचा राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर असल्यानेच त्यांना अटक होतं नसल्याचा आरोप मनसेचे राजू कुकडे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला असून तसे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्यांनी दिले आहे. जर पोलीस प्रशासनाने आरोपी नीता सिंघवी यांना अटक करून करवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू कुकडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.यावेळी मनसेच्या वनिता चिलके. सुमन चामलाटे. कोटेश्वरि गोहने. अतुल दिघादे व इतर मनसैनिक उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा