You are here
Home > चंद्रपूर > अखेर कोरोनाच्या लॉक डाऊनमधे सापडलेल्या आईच्या मुलांसोबत भेटीनंतर समाजमन गहीवरले !

अखेर कोरोनाच्या लॉक डाऊनमधे सापडलेल्या आईच्या मुलांसोबत भेटीनंतर समाजमन गहीवरले !

पतीच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा हजर राहू न शकणाऱ्या कविताला प्रशासनाने घेतली दखल !

मूल प्रतिनिधी :-

कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे तेलंगनात अडकून असलेली पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही, एवढेच नव्हे तर एकाकी पडलेल्या मुलालासुद्धा सांभाळण्यासाठी आई नव्हती. पण अशा द्रुष्ट चक्रात फसलेल्या आई ला तिच्या मुला सोबत जिल्हा प्रशासनाने भेट घडवुन आणली, तो भेटीचा प्रसंग पाहणाऱ्यांनी अनुभवला खऱ्या आई मुलाचा दुःखद व तसाच थरारक विलाप,

मूळचे मूल तालुक्यातील बोरचांदली येथील रुपेश रामटेके हे मजूर कुटुंब असल्याने व पतीही आजारी राहत असल्याने कविता भडके ही महिला आपला पती व 10 वर्षाच्या मुलाला खेडी येथे माहेरी ठेऊन तेलंगणा येथे मिरची तोडण्यासाठी गेली. जगात कोरोनाचे संकट आले देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली त्यामुळे या कुटुंबालाही पटका बसला त्यातच पती रुपेश याची तब्येत बिघडली.
पत्नीच्या नातेवाईकांनी सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र तब्येत खालावत असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिकडे पत्नीला कळवले मात्र लॉकडाऊनमुळे तिचे येणे शक्य नव्हते कारण काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. अशा वेळी नातेवाईकांना पत्नी जिवंत असतांना तिच्या शिवाय अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी पाळी आली. पण अशा दुःखद प्रसंगी मुलाला सांभाळण्यासाठी आईपण जवळ नव्हती हे तेवढेच दूर्भाग्य होतं, हे प्रकरण प्रसार माध्यमांनी व सर्च टीवी ने उजेडात आणल्यानंतर प्रशासन जागे झाले व आईला मुलाकडे पोहचविन्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटीवार,जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, स्वयंसेविसंस्थेनी सुद्धा मदत केली.आणि तब्बल 2 महिन्यानंतर आई व लहान मुलाची भेट झाली पण हा प्रसंग बघून सर्वाना गहिवरून टाकले.याप्रसंगी सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सहायक पोलिस निरीक्षक पुंडलिक मस्के, डॉ कर्मवीर गोबाडे, पोलीस पाटील कृपाल दुधे, ग्रामसेवक वाकडे, सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कविताला होम कोरेन्टाईन करण्यात आले हे विशेष.!

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा