You are here
Home > चंद्रपूर > दखलपात्र :-घुग्घुस येथील श्रिनीवास गुडला यांचे वर गुन्हा दाखल !

दखलपात्र :-घुग्घुस येथील श्रिनीवास गुडला यांचे वर गुन्हा दाखल !

तेलंगणा राज्यातून आल्यानंतर माहीती लपविल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व साथी रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई !

घूग्गूस प्रतिनिधी :-

घुग्घुस येथील सक्रिय कार्यकर्ते तथा काँग्रेस शहराध्यक्ष राजु रेड्डी यांचे खंदे समर्थक श्रिनीवास मुर्ती गुडला (३८) रा. शालीकराम नगर यांचेवर घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कलम २६९,२७०,२७१,१८८ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व साथी रोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही शनिवार ला रात्रीच्या दरम्यान करण्यात आली आहे.

श्रिनीवास गुडला हे तेलंगाना राज्यातील वरंगल येथुन घुग्घुस येथे स्वगॄही अनधिकृत रित्या आले होते आणि प्रशासनाकडे माहीती न देता गुप्तपणे आपल्या घरी ते राहत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या घरून त्यांना अटक करण्यात आली व त्यांचावर गुन्हा दाखल करुन विलगीकरणा साठी चंद्रपुर येथे पाठविले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा