You are here
Home > महत्वाची बातमी > अत्त्यावश्यक:- फेसबुक लाईव्ह वर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष साधणार पत्रकारासी संवाद !

अत्त्यावश्यक:- फेसबुक लाईव्ह वर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष साधणार पत्रकारासी संवाद !

महाराष्ट्रातील पत्रकार वार्ताहर व प्रतिनिधी यांच्या परिस्थिती संदर्भात साधणार संवाद !

मुंबई:

महाराष्ट्रात कोरोना लॉक डाऊन मध्ये इतिहासात पहिल्यांदाच सर्वच वृत्तपत्रची छपाईच काही दिवस बंद राहील. सध्या मोठ्या समूह वृत्तपत्र छापत असलेतरी काही भागाचा अपवाद वगळता घरोघरी वितरण बंद आहे. जिल्हा स्तरावरील तर बहुतांशी वृत्तपत्रांची छपाईच बंद असुन सर्वज ई पेपर देत आहेत.समाजमाध्यमाचा वाढता प्रभाव, जाहिरातींचे घटते प्रमाण,सरकारचे धोरण आणि कोरोनाची टाळेबंदी मुळे, वृत्तपत्र माध्यमांचे काय नुकसान होत आहे? यामुळे पत्रकारांना कोणत्या समस्यांना समोर जावे लागते? जिल्हा वृत्तपत्र व ग्रामीण पत्रकारांन समोर काय आव्हाने निर्माण झाली आहेत ? अशा परिस्थितीत वृत्तपत्र माध्यमाचे भवितव्य काय? अशा सर्वकश चर्चा करण्यासाठी, शासनाच्या औरंगाबाद विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्षपद मा.वसंत मुंडे बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी, सायंकाळी ५ वाजता,सुर्येदय च्या फेसबुक लाईव्ह वर येत आहेत.आपण सहभागी होऊन प्रश्न विचारू शकता, चर्चा करू शकता.असे विश्वास आरोटे सरचिटणीस,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा