You are here
Home > भद्रावती > धक्कादायक :- विदर्भातील सर्वात मोठी रेती तस्करी भद्रावती तालुक्यातून ?

धक्कादायक :- विदर्भातील सर्वात मोठी रेती तस्करी भद्रावती तालुक्यातून ?

वासुदेव ठाकरे या रेती माफियाची तहसीलदार महेश शितोळे सोबत भागीदारी ? जिल्हाधिकारी यांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी – जनतेची मागणी.

रेती चोरी भाग-१

सध्या देशात आणि राज्यात कोरोना संकट ओढविल्यामुळे लॉक डाऊन करण्यात आले असून या लॉक डाऊन मधे सुद्धा संधीचा फायदा घेवून काही लोक रेती व कोळसा तस्करी करीत आहे अशा गैरव्यवहार करणाऱ्यांवर शासनातर्फे मोठी कारवाई करणे अपेक्षित असतांना सुद्धा स्थानिक अधिकारी यांच्या आशीर्वादाने ही कामे राजरोसपणे सुरू असून या लॉक डाऊन मधे भद्रावती तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी वासुदेव ठाकरे हा रेती माफिया करीत असल्याचा व त्याच्यासोबत भद्रावती तहसीलदार महेश शितोळे हे त्या कामात भागीदार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, अर्थात त्यामुळेच या रेती माफियावर कुठलीही कारवाई न करता तहसीलदार यांनी केवळ छोट्या ट्रक्टर मालकांवर कारवाई करून विदर्भातील सर्वात मोठ्या रेती माफियावर कारवाई करण्याचे जाणीवपूर्वक टाळले असल्याचे स्पष्ट होत आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वतःला खासदार आमदार यांच्याशी जवळचा संबंध असल्याच्या नावाखाली रेती तस्कर वासुदेव ठाकरे यांनी गैरमार्गाने मांजरी वेकोली क्षेत्रात व सभोवतालच्या गाव शिवारात शेकडो हायवा ट्रक रेतीची साठवणूक केली आहे. वेकोली मांजरी परिसरातील रेती साठा हटविण्याबाबत वेकोली अधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र दिले असतांना सुद्धा तहसीलदार हे रेती माफिया ला वाचण्यासाठी ही बाब वेकोली प्रशासनावर ढगलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . त्यामुळे कोट्यावधी रुपयाची रेती तस्करी होऊन शासनाचा महसूल स्वतः तहसीलदार हेच बुडवित असल्याचे दिसत असल्याने रेती माफिया यांच्यासोबत तहसीलदार यांची भागीदारी तर नाही ना ? हा प्रश्न उपस्थित होत आहे, आता या रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्या अवैध धंद्याचे स्त्रोत  हळू हळू समोर यायला लागले असून कमी काळात त्यांची वाढलेली अमाप संपती बघून सर्वाना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे, त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार शितोळे आणि रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्यावर त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत असल्याने या रेती माफियाच्या मुसक्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कशा आवळल्या जाणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा