You are here
Home > भद्रावती > धक्कादायक :- रेती माफिया वासुदेव याची पोल खूलणार या भीतीने संपादकाला जीवे मारण्याची धमकी ?

धक्कादायक :- रेती माफिया वासुदेव याची पोल खूलणार या भीतीने संपादकाला जीवे मारण्याची धमकी ?

चंद्रपूर मधे येवून संपादकांच्या घराची केली पाहणी, उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या कारवाई ची बसली धडकी ? जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे होणार तक्रार !

रेती चोरी भाग -३

केवळ भद्रावती तालुक्यात व चंद्रपूर जिल्हातच नव्हे तर विदर्भात सुद्धा भद्रावती तालुक्यातील वासुदेव ठाकरे यांच्या रेती चोरी प्रकरणाची चर्चा जोरात सुरू असून एकीकडे भद्रावती तहसील प्रशासन कुचकामी ठरले असले तरी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या रेती माफियांच्या रेती साठय़ावर सुरू झालेल्या कारवाईने रेती माफियांचे धाबे आता दणाणले आहे. मात्र आता आपले सगळे अस्तित्व पणाला लागेल आणि आपली रेती चोरीची दुकानदारी बंद होणार या भीतीने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलचे  संपादक राजु कुकडे यांना जीवे मारण्याची सुपारी रेती माफिया वासुदेव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली असल्याची विश्वसनीय माहीती असून स्वतः वासुदेव ठाकरे व एका सहकाऱ्यांनी संपादकांना हे प्रकरण थांबवा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असे सांगून संपादकांच्या घराची सुद्धा पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रेती चोरी प्रकरणाला  वेगळे वळण मिळाले असून संपादक, पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्यानिशी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना तक्रार देणार असल्याची  माहीती आहे. महत्वाची बाब म्हणजे अगोदरच अनेकांच्या जिवावर उठणाऱ्या रेती तस्कराच्या मुसक्या प्रशासनाने आवळने आवश्यक झाले आहे .

मागील वर्षापासून रेतीच्या घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती माफियांचे चांगलेच फावलें होते आणि रेती माफीयांनी रेती घाटातून लाखो ब्रॉस रेती चोरी केल्याने शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलावर पाणी फेरले गेले आहे. अर्थात या कार्यात काही भ्रष्ट अधिकारी यांचा मोठा हातभार लागला आहे.
खरं तर देशात लॉक डाऊन असतांना राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम चोरी हा गंभीर गुन्हा असून वासुदेव नामक रेती माफीयांनी अगदी याच लॉक डाऊन स्थितीचा गैरफायदा घेवून आपल्या पोकल्याण मशीन सरळ रेती घाटावर लावून पिंपरी आणि चारगाव कुणाडा या गावा शेजारी असलेल्या नदी पत्रातून लाखो ब्रॉस रेतीची चोरी करून त्याचा साठा मैकविल सिमेंट प्रॉडक्ट च्या ठीकाणा सह किमान चार ठिकाणी हा रेती साठा जमा केला आहे. त्यापैकी उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी एका रेती साठय़ावर कारवाई केली असून यापुढे सगळेच रेती साठे पकडल्या जाऊन पकडलेल्या रेती साठय़ाचा जाहीर लिलाव करून तो रेती साठा तालुक्यातील घर बांधकाम करण्यासाठी वापरला जावू शकतो अशी माहीती उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की या प्रकरणात आपण कुणाला सोडणार नसून दोषी असणाऱ्या सर्वावर कारवाई करू आणि शासनाच्या तिजोरीत लिलाव झालेल्या रेतीचा महसूल पाठवू, त्यामुळे त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम करावा तेवढा कमीच आहे, कारण एकीकडे रेती माफियांना सरक्षण देणारे अधिकारी हे राष्ट्रीय संपत्तीची चोरी होताना बघ्यांची भूमिका घेतात तर दुसरीकडे जॉबाज उपविभागीय अधिकारी शिंदे हे रेती माफियांचे कर्दनकाळ ठरत आहे. आता त्यांच्या नेत्रुत्वात या रेती चोरी प्रकरणाला काय दिशा मिळेल आणि कुणाचा बळी जाईल हा काळच ठरविणार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा