You are here
Home > कोरपणा > मागणी :- सिमेंट उद्योगातील कंत्राटी कामगारा करिता प्रहार चे निवेदन !

मागणी :- सिमेंट उद्योगातील कंत्राटी कामगारा करिता प्रहार चे निवेदन !

अन्यथा सिमेंट उद्योगावर कारवाई होणारच-सूरज ठाकरे यांचा इशारा !

प्रमोद गिरटकर कोरपना
प्रतिनिधी,

मागील दोन महिन्यांपासून सम्पर्ण देशात कोरोना विषाणूने थयमान घातले असून, प्रतिबंध म्हणून सर्वच उद्योग बंद करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उद्योगामध्ये काम करणाऱ्या अस्थाइ- कामगारांना त्यांचे मासिक वेतन देने अभिप्रेत आहे,
मात्र कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योगाने या मध्ये अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड सिमेंट कंत्राटी कामगारांना अर्ध्या महिना लोटल्या नंतर ही वेतन दिलेले नाही त्यामुळे कामगारांच्या चुली बंद पळण्याच्या अवस्थेत असून उद्योगातील अनेक कामगारांनि गनिमी रीतीने प्रहार चे जिल्हा प्रतिनिधी सूरज ठाकरे यांच्याशी सम्पर्क साधून कामगारांचे वेतन तात्काळ द्यावे,
अशी विनंती सह्ययक कामगार आयुक्त चंद्रपूर यांना केलेली असून, सम्बदीत उद्योगातील वरिष्ठांशी सम्पर्क साधला असता त्यांनी सम्बधित प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ केली याचाच अर्थ उद्योजकाना केवळ कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाऊन गब्बर बनणे हाच एक हेतू नजरे समोर येतो या समशेची दखल परिसरातील कोणत्याही कामगार धार्जिणे संघटनने घेतली नसून उद्योजका कळून माया ताईचा आस्वाद घेण्यातच स्वारस्य मानल्याचे दिसते…
सदर कामगारांची समस्या त्वरित न मिटल्यास प्रहार च्या वतीने जिल्हा अध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढील दिशा ठरविण्यात येईल…

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा