You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूरकरांना सुखद बातमी :- चंद्रपूरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांतील पाचही सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह !

चंद्रपूरकरांना सुखद बातमी :- चंद्रपूरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांतील पाचही सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह !

त्या पॉझिटिव्ह रुग्णाची पुन्हा टेस्ट रिपोर्ट होण्याची शक्यता !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात नुकत्याच १३ मे ला एका २३ वर्षीय मुलीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती आणि चंद्रपूर शहरात पुन्हा लॉक डाऊन सक्त करण्यात आले होते त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनता गोंधळलेली होती की त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या किती लोकांना कोरोना ची लागण झाली असेल ? परंतु जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बिनबा परिसरातील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व 5 सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती जाहीर झाल्याने चंद्रपूर शहरातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे. अगोदरच हाताला काम नाही आणि छोटे मोठे दुकाने बंद यामुळे जनता आर्थिक द्रुष्टीने त्रस्त झाली असतांना आता नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने सगळीकडे चिंतेचा सूर होता. मात्र आता पुन्हा चंद्रपूर शहर पूर्वपदावर येईल अशी शक्यता आहे .

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा