You are here
Home > मुंबई > ‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार !

‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार !

हिंदु धर्माला हिंसक व भारतीय संस्कृतीला अश्‍लील दाखवणार्‍याची तक्रार

नेटफ्लिक्सच्या माध्यमांतून हिंदु धर्माला हिंसक व भारतीय संस्कृतीला अश्‍लील दाखवून भारतीय संस्कृती आणि हिंदू यांच्याविषयी भारतासह जगभरात घृणातिरस्कार निर्माण करण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले आहेयामुळे माझ्यासह अनेक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेतत्यामुळे ‘नेटफ्लिक्स’ कंपनी आणि त्याचे मालकमुद्रकविक्रेतेकलाकारअधिकारी सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावीतसेच ‘नेटफ्लिक्सच्या प्रसारणावर बंदी आणावीअशी तक्रार हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्रीसतीश कोचरेकर यांनी 13 सप्टेंबरला सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली आहेसोबत याविषयीची तक्रार मुंबई पोलीस आयुक्ततसेच माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाकडेही करण्यात आली आहे.

या तक्रारीमध्ये श्रीसतीश कोचरेकर यांनी म्हटले आहे की, ‘नेटफ्लिक्सवरील ‘लैला’ या मालिकेत ‘आर्य’ या हिंदू पात्राला अत्यंत क्रूर आणि आक्रमक दाखवले असून ‘आर्यवर्त’ आणण्यासाठी तो प्रयत्न करत आहे असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘सेक्रेड गेम’ या मालिकेत जगात घडणारे सर्व अपराधवाईट घटना यांना हिंदूच कसे उत्तरदायी आहेतअसे दाखवण्यात आले आहे. ‘फायर’ या वेबसिरीजमध्ये दोन जावांमध्ये (जेठणी –देवराणी यांचेसमलैगिंक संबंध दाखवून आदरयुक्त नात्यांचे अश्‍लील आणि बीभत्स स्वरूप दाखवण्यात आले आहे. ‘सेक्रेड गेम 2 जी’ आणि ‘सेक्रेड गेम सेशन 2’ मध्ये महान भारतीय संस्कृतीमधील गुरुशिष्य या पवित्र नात्याला अश्‍लील दाखवून समस्त हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा