You are here
Home > वरोरा > तक्रार :- कोटबाळा गावकऱ्यांनी दिली राशन दुकानदार सुभाष लालसरे यांची तहसीलदारांकडे तक्रार,

तक्रार :- कोटबाळा गावकऱ्यांनी दिली राशन दुकानदार सुभाष लालसरे यांची तहसीलदारांकडे तक्रार,

कमी अन्नधान्य वाटप करून भ्रष्टाचार करीत असल्याने गावकरी संतप्त ?

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील कोटबाळा येतील राशनचे वाटप एका महिला बचत गटामार्फत केले जात असून त्या वाटप गटाचे सचिव संगीता दिलीप लालसरे हया खऱ्या अर्थाने चालक असतांना हे दुकान सुभाष शिवराम लालसरे (ग्राम पंचायत सदस्य )यांच्या मार्फत चालवल्या जात आहे.
गावकर्यांच्या म्हणण्या नुसार आता असे सांगण्यात येत आहे कि देशात आलेल्या महामारी वर मदत म्हणून प्रति युनिट पाच किलो तांदूळ वाटप करण्याचे राज्य सरकाचे आदेश असून त्या आदेशाचे पालन न करता कोटबाळा येथील राशन दुकानदार यांनी प्रती युनिट चार किलो तांदूळ वाटप केले आहे अशी चर्चा आहे, तसेच काही लोकांनी आम्हाला तांदूळ कमी का दिले असे विचारणा केले असता दुकानदार कोरोना बाधित रुग्ण यांना द्यायचे आहे असे उत्तर गावकर्यांना देण्यात आले आहे, परंतु गावकरी या उत्तराशी सहमत नसून त्यांनी महिला बचत गट व राशन दुकान चालक सुभाष लालसरे यांची तक्रार वरोरा येथील तहसीलदार सचिन गोसावी यांच्या कडे केली असून आता ते बचत गट व दुकानदार यांच्यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा