You are here
Home > कोरपणा > चिंताजनक :- बुरड समाजाचा व्यवसाय डबघाईस आल्याने उपाशी मरण्याची वेळ !

चिंताजनक :- बुरड समाजाचा व्यवसाय डबघाईस आल्याने उपाशी मरण्याची वेळ !

वंशपरंपरागत धंदा लॉक डाऊन मधे चौपट झाला असल्याने ते आपली व्यथा मांडणार ते कुणाकडे ? 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

संध्या देशात कोरोना या विशाणुने थैमान माजवीला आहे. मार्च महीन्यापासून देशात व राज्यात  लॉक डाउन सुरू आहे. लॉक डाऊनच्या काळात हातावर पोट भरनारे छोटे-मोटे सर्वच व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळें बुरड समाजाचा वंश परंपरा पासून व्यवसाय आज घड़ी ला अडचनीत आला आहे. त्या मुळे परिवारच्या उदरनिर्वाहाचा  मोठा प्रशन निर्माण झाला आहे. शिबले , बेदे इत्यादि साहित्य बनवणे व विक्री करने हा समाज अनुसूचित जाति (एस सी) प्रवर्गात येतो. पण त्यांना सुविधा  त्यांच्या पर्यत पोहचत नसल्याची खंत समाजातील नागरिक व्यक्त करत आहे. वन विभागा कड्डन कुठल्याही बांबू उपलब्ध होत नसल्यामुळे त्याना शेतातील बांबु विकत घेऊन त्याच्या उदर निर्वाह करावा लागतो. सध्या लॉक डाउन असल्यामुळे बांबुची आवक थांबली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी निष्काळजीपणा करत असल्यामुळे कोरपना येथे निस्तार केलेला बांबु चा पुरवठा झालेला नाही. यामुळे आज बुरड समाजावर उपसमारिची वेळ आली आहे. ऐन मौसमात या समाजात परंपरागत  व्यवसाय अडचणित आला आहे. * शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी . * किंवा बुरुड समाजाला नाममाञ व्याजावर व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बैंक कडून कर्ज़ उपलब्ध करुण द्या, जेनेकरूण आज डबघाइस झालेला आमच्या समाजाला नवसंजीवनी मिळेल व परीनामी आर्थिक कोड़ीत सापडलेला समाज  बाहेर निघेल, अस मत युवा बुरड समाज संघटनेचे सागर बुरेवार, प्रनीत माजरे l,प्रमोद बुरेवार , रजत बुरेवार , अमर मादेवार गणेश चिल्लगरवार यानी व्यक्त  केला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा