You are here
Home > कृषि व बाजार > पीडित मुलीचे आरोप धोटे बंधूंच्या दबावातून-मनसे

पीडित मुलीचे आरोप धोटे बंधूंच्या दबावातून-मनसे

चंद्रपूर (प्रतिनिधी )…राजुरा येथे मागील महिन्यात उघड झालेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवरील अत्त्याचारांची सीआईडी चौकशी सुरू असतांना त्याचं परिसरात असलेल्या नर्सिंग कौलेज मधील आठ महिन्या आगोदर एका 21 वर्षीय युवतीवर कुलकर्णी नावाच्या प्राचार्याकडून विनयभंग झाल्याची बाब उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. मात्र हे प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना जाणीवपूर्वक फसवीण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीं पीडित युवतीला पाच लाख रुपये आमिष दिल्याची बाब पीडित युवतीने स्वतः प्रसारमाध्यमांसमोर सांगितल्याने ह्या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण मिळाले होते. तशा बातम्या प्रसारमाध्यमांत झलकल्या होत्या त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यानीं या बाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि पीडित युवतीने लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धोटे समर्थकाच्या दबावापोटी केल्याचा आरोप मनसेचे राजू कुकडे यांनी लावून या प्रकरणात पीडित युवती ही मनसेच्या पदाधिकाऱ्याची बहीण असल्यामुळे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी मुलीचे बयान महिला पोलीस अधिकारी यांच्या समक्ष तोंडी आणि विडियो घेवून प्रकरणाचे गांभीर्य बघता यामधे प्रथमदर्शनी दोषी सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांचेवर विनयभंग व धमकी देणे याबाबत गुन्हे दाखल केले असे असतांना पीडित युवतीला धोटे समर्थक यांनी पीडित युवतीच्या अजगर नावाच्या भावाच्या मदतीने त्या युवतीचे अपहरण करून तीचेवर दबाव टाकला व तिला पैशाचे आमिष देवून मनसे पदाधिकाऱ्यांविरोधातच आरोप करण्यास लावले.पीडित युवतीने मनसे पदाधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयाचे आमिष देवून धोटे बंधूंना या प्रकरणात अडकविण्याचा जो आरोप लावला तो खोडून काढण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी यांनी चक्क युवतीचे मनसेच्या महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या मोबाईलवरील संभाषणाची ऑडियो ऐकवली. या प्रसंगी मनसेचे राजू कुकडे यांनी प्रतिक्रीया देताना असे म्हटले की सुभाष धोटे किंव्हा अरुण धोटे हे आम्हचे राजकीय शत्रु नाही आणि राजकीय स्पर्धक सुद्धा नाही त्यामुळे त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच लाख रुपये आमिष देऊन अडकविण्याचा युवतीचा आरोप खोटा असून या प्रकरणात त्या युवतीचे अपहरण करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करावे अशी मागणी संयुक्तपणे राजू कुकडे व मनसेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी केली आहे याप्रसंगी मनसेचे राजू बघेल .सुमन चामलाटे. कोटेश्वरि गोहने व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा