You are here
Home > भद्रावती > सणसणीखेज:- रेती माफिया वासुदेव ठाकरे यांची कारवाईतून बचावाकरिता पळापळ सुरू, आणखी घबाड समोर येण्याची चिन्हे ?

सणसणीखेज:- रेती माफिया वासुदेव ठाकरे यांची कारवाईतून बचावाकरिता पळापळ सुरू, आणखी घबाड समोर येण्याची चिन्हे ?

रेती चोरीचे मोठे साठे महसूल विभागाने जप्त केल्यानंतर त्या रेती साठ्याचा होणार लिलाव, हायवा ट्रक व इतर मशीन  होणार जप्त, यामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ!

रेती चोरी भाग-

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती वासुदेव ठाकरे यांची रेती चोरी प्रकरणाची मालिका भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी रेती माफिया म्हणून कुख्यात असलेल्या वासुदेव ठाकरे यांच्या सर्व रेती साठ्यावर धाड टाकून हजारो ब्रॉस रेती साठा जप्त केला होता. या संदर्भात त्यांनी भद्रावती पोलिस स्टेशन येथे पूर्वश्रमिचे वासुदेव ठाकरे यांचे  रेती चोरीमधे भागीदार म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार शितोळे यांच्या माध्यमातूनच वासुदेव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी लावून भांदवी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यास पोलिस प्रशासनाला भाग पाडले.

हया रेती चोरी प्रकरणाची मालिका जसजशी क्रमशः सुरू होती तसतसे वासुदेव ठाकरे त्यांचे बंधू आणि त्यांचे साळे यांनी संपादक राजु कुकडे यांना पाहून घेण्याच्या धमक्या दुसऱ्या मार्फत दिल्या, एवढेच नव्हे तर भद्रावती मधील पत्रकारांना सुद्धा आर्थिक लाभ पोहचवूण आपल्या बाजूने केले व त्यामुळेच भद्रावती मधील काही पत्रकारांनी एक बैठक घेवून भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या प्रतिनिधींना सांगितले की तुम्हाला कोणी मारले तर पत्रकार संघ जबाबदार राहणार नाही असा जणू इशारा देवून आपण रेती माफिया यांच्या बाजूने अहो असे संकेत दिले. खरं तर देशात, राज्यात आणि जिल्ह्यात काही पत्रकार सोडले तर बहुतांश पत्रकारांच्या लेखण्या हया अवैध व्यवसायी, भ्रष्ट, चोर लूचक्के बदमाश आणि सत्ताधारी यांच्याकडे गहाण आहेत, त्यामुळेच काही राजकारणी पडद्यामागे एवढ्या चोऱ्या बदमाशा आणि व्यभिचार करतांना सुद्धा जनतेसमोर मात्र जणू स्वच्छ राजकारणी म्हणून, मिरवितात, परंतु  सर्वात मोठ्या आपल्या लोकशाही देशात अशा लोकांमुळे लोकशाहीच धोक्यात आली असून व्यवस्थेविरोधात आणि सरकारच्या संपतीची चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकारांनाच जर धमक्या मिळत असेल तर हे लोकशाहीचे दूर्भाग्यच म्हणावं लागेल, कारण एका विचारवंतांनी म्हटलं आहे की, “मेलेले ते लोक नाहीत ज्यांच्यात प्राण नाही, पण ते लोक सुद्धा मेलेले आहेत ज्यांच्यात चोराला चोर म्हणण्याचे आणि खोट्याला खोटं म्हणण्याचे धाडस नाही”

काय आहे वासुदेवचे  राज ?

रेती माफिया वासुदेव यांनी छोट्या छोट्या ट्रक्टर चालक मालक यांना तहसीलदार शितोळे यांच्या मार्फत ट्रक्टर जप्तीच्या कारवाया करायला लावून त्यांना देशोधडीला लावले आहे. यामधे काहींनी हा व्यवसायच सोडला तर एकाने कर्जाचा डोंगर आणि ट्रक्टर जप्त झाल्याच्या झटक्याने प्राण सोडले. एवढेच नव्हे तर काहींचे ट्रक्टर अजूनही जप्त आहे पण जवळपास दोन हजार ब्रॉस पेक्षा जास्त रेती साठा आणि आजपर्यंत लाखो ब्रॉस रेती विकणाऱ्या वासुदेव ठाकरे यांच्यावर एकही कारवाई नाही ? हे कसं काय शक्य आहे ? पण स्थानिक पत्रकार यांना आर्थिक पाठबळ देवून तहसीलदार शितोळे सारख्या अधिकाऱ्यांना पाठीशी घेवून रेती तस्करीच साम्राज्य तयार करणाऱ्या वासुदेव ठाकरे यांच्या मुसक्या कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी आवळल्याने त्यांची कारवाई पासून बचावाकरिता पळापळ सुरू असल्याची माहीती असून त्यांचे आणखी काही सनसनिखेज घबाड समोर येणार असल्याचे संकेत मिळत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा