You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :- वेकोलि कर्मचाऱ्याने शेजारीच राहणाऱ्या युवतीवर केला अतिप्रसंग !

धक्कादायक :- वेकोलि कर्मचाऱ्याने शेजारीच राहणाऱ्या युवतीवर केला अतिप्रसंग !

आरोपी प्रतीक वसंता वैरागडे ६ दिवसापासून फरार. पैशाच्या जुगाडात आरोपीच्या मागे लागली यंत्रणा ? पोलिसांचा शोध सुरू. लॉक डाऊन च्या काळातील सर्वात मोठी घटना !

राजुरा प्रतिनिधी :-

वेकोली येथे कार्यरत एका प्रतीक वसंता वैरागडे हया युवकाने शेजारीच राहणाऱ्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. विशेष म्हणजे यांच्यातील सबंध २८नोव्हेंबर २०१९ पासुन सुरु असल्याचे मुलीनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान लॉक डाऊन च्या काळात सदर युवकाने शहरालगत असलेल्या बामणवाडा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी ह्या युवती सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र युवतीला लग्न करण्यास नकार दिला त्यामुळेच युवतीने १३ मे २०२० रोजी राजुरा पोलिस स्टेशन मधे तक्रार केली होती. तक्रार झाल्याचे कळताच सदर युवक बेपत्ता असुन त्याचा फोन सुद्धा बंद आहे. ह्या घटनेत वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असुन आरोपी प्रतीक वैरागडे ह्याच्यावर अपराध क्रमांक 301/2020, अन्वये भादंवि 376, 325, 324, 506, 504 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली असुन पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेला जवळपास ६ दिवस लोटून सुद्धा आरोपी पोलिसांना सापडला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात असून राजुरा शहर व तालुक्यातील प्रसारमाध्यमांनी नेमके काय केले हे समजयायला मार्ग नाही अर्थात मुलींच्या बाजूने एक पार्टी आणि मुलांच्या बाजूने एक पार्टी अशी जुगलबंदी होतं असून या नादात या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे . मात्र भुमीपुत्राची हाक द्वारे या संदर्भात एक विश्वसनीय माहीती प्रसारित होणार असून पैशाच्या नादात आपली अस्मिता गमावण्याची वेळ अनेकावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकरणाला विशेष महत्व आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा