You are here
Home > चंद्रपूर > संतापजनक :-लॉकडाऊन काळात सुद्धा हरीश ठक्कर सुगंधित तंबाखू बेभाव विकत असल्याने संताप ?

संतापजनक :-लॉकडाऊन काळात सुद्धा हरीश ठक्कर सुगंधित तंबाखू बेभाव विकत असल्याने संताप ?

के,जी,एन पडोली च्या कारवाई नंतर चंद्रपूरात पुन्हा काल झाली कारवाई !

चंद्रपूर शहरा सोबत संपूर्ण जिल्ह्यात सुगंधी तंबाखू चा मोठा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या यादीत सुमार असलेल्या एस पी कॉलेज जवळील हरीश ठक्कर नामक मोठया व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि गोडाऊन मधे अन्न औषधी प्रशासनाने धाडी टाकून मोठा साठा जप्त केल्याने सुगंधीत तंबाखू व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. लॉक डाऊन च्या काळात सुगंधी तंबाखू चढ्या भावाने विकून मोठी कमाई करीत असलेल्या हया विक्रत्याविरोधात कारवाई झाल्याने अनेक दुकानदारांनी आपला सुगंधी तंबाखू साठा गुप्त जागी हलवला आहे. या आधी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनी 16 लाखाहून अधिक च्या सुगंधित तंबाखू साठा पडोलीच्या के जी एन नामक दुकान व गोडाऊन मधून जप्त केला होता व त्यानंतर दिनांक २२ मे ला या सुगंधित तंबाखू विक्रत्या विरोधात अन्न औषधी विभाग कारवाई केली आहे.

दिनांक 21 मे रोजी ,चंद्रपूर शहरातील विवेकानंद वॉर्ड,एस पी कॉलेज जवळ हरीश अंबाराम ठक्कर यांचे में. जया ट्रॅडिग कंपनी दुकान व गोडाऊन मध्ये धाड टाकून चंद्रपूर अन्न औषधी विभागानी नाममात्र कारवाई केल्याची माहीती असून त्यामध्ये माझा, सुगंधित तंबाखू, पान पराग पानं मसाला,इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला ज्याची किंमत अंदाजे 68000 इतकी असल्याचे अन्न औषधी प्रशासनाकडून बोलल्या जात आहे तर बाजारभवानुसार या साठ्याची किंमत अंदाजे 1.5 लाख इतकी आहे, सदर साठा जप्त करून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुढील कार्यवाही नमुन्या ची रिपोर्ट आल्यावर केली जाणार असल्याचे नितीन मोहिते सहाय्यक आयुक यांनी सांगितले आहे. व अन्न औषधी प्रशासनानी जनतेला आव्हान केले  आहे की अशा प्रकारे कोणी ही अवैध प्रतिबंधित तंबाखू विक्री करीत असतील तर अन्न औषधी विभागात याची सूचना द्यावी.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा