You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात सकाळीच चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ !

ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात सकाळीच चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ !

जिल्ह्यात आता एकूण १९ रुग्णांची नोंद तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आज रविवारी सकाळीच ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त हाती आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रीन झोन कडे मार्गक्रमण करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात बाहेर प्रांतातून आणि जिल्ह्यातून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळेच जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आज सकाळीच आलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्ण दुर्गापूर १, घुग्घुस १ व अन्य २ ठिकाणचे रहिवासी आहेत.
या ४ नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १९ वर पोहोचला असून जिल्ह्यात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता आहे।खरं तर जिल्हा प्रशासनाने बाहेर प्रांतातून आणि जिल्ह्यातून आलेल्या लोकांना होम कोरोनटाईन न करता त्यांना विलगिकरन कक्षात ठेवून त्यांचा ऊपचार करायला हवा होता. काही बाबतीत प्रशासनाने तशी व्यवस्था केली मात्र अनेक लोक जे बाहेरून आले त्यांना विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले नाही नव्हे काही ठिकाणी तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची व इतरांची टेस्ट करण्यात आली नाही अर्थात एकीकडे पोलिस प्रशासन शहरात निरपराध लोकांना कोरोना च्या या लॉक डाऊन मधे लायसन्सच्या नावावर जणू गाड्यांच्या चैलान करून लुटत आहे व अगोदरच कामधंदा नसल्याने हजारो लोक बेरोजगार झाले त्यांना मदत मिळत ऐवजी त्यांची कामासाठी फिरणाऱ्याना लुटल्या जात असेल तर त्यांनी या संकटात काय आत्महत्या करायच्या का ? असा प्रश्न उभा राहत आहे. मात्र असे असले तरी जिल्हा प्रशासनाने बाहेर प्रांतातून आणि जिल्ह्यातून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे तरच जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आपण आणू शकतो …

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा