You are here
Home > कोरपणा > क्राईम रिपोर्ट :-कोरपना येथे दारू तस्करी जोरात सुरू  पोलीस प्रशासन साखर  झोपेत?

क्राईम रिपोर्ट :-कोरपना येथे दारू तस्करी जोरात सुरू  पोलीस प्रशासन साखर  झोपेत?

कोरपणा येथे देशी विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री कुणाच्या आशीर्वादाने ? 

कोरपणा प्रतिनिधी ;-

एकिकडे संपुर्ण देश कोरोनाच्या संकटात आहे, मात्र कोरपना तालुक्यात व कोरपना नगरपंचायत हद्दीत अवैध्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात पोलिस प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरु आहे. दारू विकणारे दारू तस्कर हे अवैधरित्या शेजारच्या येवतमाळ जिल्ह्यातील मुकूडबन ह्या ठिकाणावरुन,जेथे शासनाने देशी दारु विकण्यास परवानगी दिली आहे, तेथून पायवाट मार्गाने खातेरा-पारडी नदीतून व गाडेगाट आम्लान जेवरा पठार या दोन्ही ठिकाणांहून दिवस-रात्री अवैध्य दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.५०रूपये किमतीची छोटी देशी दारूची बॉटल २०० ते २५०रुपयाला सर्रासपणे विकली जात आहे.एकिकडे चंद्रपुर जिल्हा दारू बंद असुन सुद्धा व या सर्वच प्रकारची माहिती पोलीस प्रशासनाला असुन सुद्धा  पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळताना दिसून येत आहे, व दारु तस्करी करण्यासाठी सर्व रान मोकळ केलेल दिसत आहे. आज कोरपना नगरपंचायत भागातील महिलांना ह्या कोरोना संकट काळात अवैध दारू विक्री व होत असलेल्या आथिर्क नुकसानीमुळे  मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, ह्या अवैध्य दारू विकणाऱ्यावर कोन आळा घालणार? यावर कोरपना नगरपंचायतीच्या भागातील जनतेला मोठा प्रश्न पडलेला आहे..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा