You are here
Home > कोरपणा > गंभीर घटना :-दुचाकीवरून पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू एक गंभीररीत्या जखमी.

गंभीर घटना :-दुचाकीवरून पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू एक गंभीररीत्या जखमी.

पारडी येथील शिवमंदिर जवळची घटना !

कोरपना मनोज गोरे

कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा वाहन स्लीप होऊन मृत्यू झाला. तर त्या समेवत असलेला गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास कोरपना- आदीलाबाद मार्गावरील पारडी येथील शिवमंदिर जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रकाश बापूराव जुमनाके ( २२ वर्ष ) , गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२ वर्ष ) रा. मानोली खू हे दोघे ही लग्नानिमित्त मानोली वरून रूपापेठसाठी निघाले होते. दरम्यान पारडी जवळ त्यांची दुचाकी क्रमांक एम एच ३४ एक्स ३७४१ ही वेगात असल्याने अनियंत्रित होऊन
रस्त्यालगतच्या गिटी वर स्लिप होऊन आदळल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अरुण गुरनुले व पोलीस कर्मचारी अशोक मडावी, साईनाथ जायभाये घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून लागली मृतक व गंभीर रित्या जखमी रुग्णाला कोरपणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीररीत्या जखमीला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा