You are here
Home > वरोरा > उपक्रम :- ऊपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या अनोख्या उपक्रमांची रेती माफियांना धडकी. जप्त  केलेली रेती थेट तहसीलदार कार्यालयात !

उपक्रम :- ऊपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या अनोख्या उपक्रमांची रेती माफियांना धडकी. जप्त  केलेली रेती थेट तहसीलदार कार्यालयात !

वरोरा तालुक्यात रेती तस्करांचे धाबे दणाणले ! मोठ्या रेती माफियावर प्रशासनाची पाळत !

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या रेती माफियांनी थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नदी नाल्यातुन रेती उत्खनन केल्या आहे व रेतीचे मोठे साठे तयार केल्या जात आहे, अशातच वरोरा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात रेती माफीयांच्या रेती साठ्यावर धाडी टाकून हजारो ब्रॉस रेतीचे साठे जप्त केले आहे।महत्वाची बाब म्हणजे त्यांनी ते रेती साठे केवळ जप्तच केले नाही तर नेहमीच जप्त केलेला रेती साठा रेती माफिया कडूनच चोरी होण्याच्या घटना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनोखी शक्कल लढवली व चक्क जप्त केलेला रेती साठा वरोरा तहसील कार्यालयात जमा केला, त्यामुळे आता अकस्मात प्रशासनाने उचललेले हे पाऊल रेती माफियांच्या मणसूब्यावर पाणी फेरणारे ठरले असल्याने उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या कामगिरीमुळे शासनाच्या महसुलात भर पडणार आहे तर दुसरीकडे रेती माफीयांची अवस्था केविलवाणी झाली आहे, नव्हे त्यांना एक प्रकारे धडकिच भरली आहे त्यामुळे  उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या या धमाल   उपक्रमाची सर्वत्र चर्चा होतं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा