You are here
Home > चंद्रपूर > पारोमिता गोस्वामी यांना ब्रह्मपुरी विधानसभेत आपची साथ

पारोमिता गोस्वामी यांना ब्रह्मपुरी विधानसभेत आपची साथ

  • अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी दिला विधानसभेसाठी अध्यक्षपदाचा राजीनामा
  • विधानसभा निवडणुकीत मिळणार आपची साथ

नागपूर /प्रतिनिधी
आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि समाजाच्या विविध घटकातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी आगामीी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राहणार असून त्यांनी मागील दीड महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे दरम्यान श्रमिक एल्गार या समाजसेवी संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला.

ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रमिक एल्गार मागील वर्षभरापासून रणनीती आखत आहे. मागील महिन्यात ऑगस्ट क्रांती संपर्क अभियान राबवून गावागावात लोकांशी संपर्क साधून प्रचाराचा नारल फोङला. आता आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना एङ. पारोमिता गोस्वामी यांनी प्रचारसभा, गावभेटी, लोकसंवादावर भर दिला आहे. सध्या या मतदारसंघात राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रतिनिधित्व करीत आहेत. एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या विजयासाठी राज्यभरातील विविध सामाजिक संघटना आणि समविचारी समाजसेवक पुढाकार घेणारे आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय त्त्याचे निवडणूक चिन्ह झाडू राहणार असल्याचे माहिती दिल्ली आणि मुंबई येथील सूत्रांनी दिली.

दरम्यान, निवङणूक रिंगणात उतरण्यासाठी श्रमिक एल्गार च्या घटनासंहितेनुसार गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

अॅङ. गोस्वामी मागील सहा वर्षांपासून अध्यक्ष पदावर कार्यरत असून, त्या ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने संघटनेच्या तरतुदीनुसार त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम यांनी सांगितले.
रिक्त झालेल्या या पदावर अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यासाठी येत्या काही दिवसातच केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन अध्यक्षपदाची घोषणा करण्यात येईल.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा