You are here
Home > महाराष्ट्र > भाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता -कर्ताधर्ता’ मोहिम

भाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता -कर्ताधर्ता’ मोहिम

मुंबई-१४ सप्टेंबर-

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सोशल मिडीयातील फेसबुक, इंन्टाग्राम, ट्विटर, एंड्रॉइट फोनचा आधार घेतला जात आहे. तरुणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशातील तरुण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम सुरु करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्याप्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत हि डिजीटल मोहिम सुरु केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी दिली. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमे अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची एक नविन फौज तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर देशातील तरुण पिढीचा विश्वास आहे. त्याचबरोबर भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, तो देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे सातत्याने काम करत आहे. आणि या तरुण पिढीचा भाजपवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे, महसुल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. राज्यात या मोहिमेत पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि भाजपचे सदस्य झाले. येणाऱ्या तीन दिवसात हि संख्या अडीच लाख होण्याची शक्यता आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाजप आणि त्यांच्या नेत्यांची उपस्थिती ही इतर पक्षातील नेत्यापेक्षा अधिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये डिजिटल इंडीया आणि तरुण पिढीचा मोठा सहभाग असणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत भाजपचे सर्वाधिक लक्ष हे कॉलेजमधील तरुणांवर असणार आहे. हे तरुण आहेत, जे मतदार तर झाले आहेत मात्र ते अद्यापही कोणत्याही पक्षाचे सदस्य झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रयत्न आहे की, या तरुणांचे पहिले मत हे भाजपला मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यात सहभागी व्हावे. त्यामुळेच ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात आली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा