You are here
Home > चंद्रपूर > रेती चोरी :- प्रिया झामरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर त्या अगोदर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर का नाही ?

रेती चोरी :- प्रिया झामरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर त्या अगोदर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर का नाही ?

अट्टल रेती चोरांना अभय देणाऱ्या तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि घूग्गूस पटवारी यांच्यावरही गुन्हे का नाही ?

रेती चोरी प्रकरण भाग- १

घूग्गूस नकोडा आणि वडा गाव परिसरात होणारे रेतीचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी बल्लारपूर येथील एका स्वयंघोषित पत्रकार महिलेला रेती घाटावर का यावे लागले ? आणि मी महसूल विभागाची अधिकारी आहे असे त्या महिलेला का म्हणावे लागले ? हा चिंतेचा आणि महसूल विभागाला चिंतन करायला लावणारा प्रश्न असून ज्या पद्धतीने प्रिया झामरे ह्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या थाटात रेती घाटावर सकाळीच जावून रेती तस्कराना धमकावत होत्या व त्या अधिकारी असल्याच्या आविर्भावात वावरत होत्या त्यावरून महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा अशाच प्रकारचे रेती घाटावर जावून व रेती तस्कराकडून पैसे घेवून त्यांना अभय देत असेल या शंकेला बळ मिळत आहे. खरं तर चंद्रपूर चे तहसीलदार गौड रुजू झाल्यापासून विशेष करून घूग्गूस परीसरतील काही रेती तस्करांना त्यानी खुली सूट दिल्याची माहिती आहे. शिवाय याच रेती घाटावर जप्त केलेली रेती लिलाव होण्याच्या अगोदरच चोरी गेल्याच्या दोन वेळा घटना घटल्याची खळबळजनक माहिती आहे. विशेष म्हणजे एक रेती साठा लिलाव झाल्यावर त्याच कारवाईतील दुसरा साठा तो सुद्धा दोन वेळ चोरी जातो आणि फक्त पोलीस स्टेशन मधे याबद्दल तक्रार देवून हा विषय सम्पविल्या जाते तर ज्यांनी पहिला रेती साठा लिलावात घेतला त्यांनीच दुसरा रेती साठा अगोदर गायब केला नसेल हे कशावरून? हा प्रश्न सुद्धा सर्वाना पडला आहे. वडा गावालगत असलेल्या अवैध रेती उत्खननाविषयी महसूल प्रशासन सतर्क नाही नव्हे ते हप्ता वसुली करतात अशी सर्वत्र ओरड होत असताना ही बाब प्रिया झामरे यांनी ओळखली आणि त्यांनी आपल्या सहकारी यांना सोबत घेवून  चक्क खनिकर्म अधिकारी यांच्या भूमिकेत वडा रेती घाटावर एन्ट्री केली.एवढेच नव्हे तर  पोलीस पाटील आणि पटवारी यांना रेती घाटावर बोलवले याचा अर्थ प्रिया झामरे यांना या रेती घाटावर या अगोदर काय होत होते याची पूर्ण माहिती होती आणि त्यामुळेच त्यांनी रेती तस्करावर दबाव बनवून 42 हजार रूपये वसूल केल्याची माहिती आहे. अर्थात आता तहसीलदार गौड व त्यांच्या खालच्या अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादानेच रेतीचा हा कोट्यावधीचा धंदा राजरोसपणे चालत असल्याचे संकेत मिळत आहे. मोवीन खान हे घूग्गूस परिसरात रेती तस्कराचे किंग असून त्यांच्या मशीन द्वारे रेती घाटावर 15000 ते 20000 ब्रॉस रेतीचे खड्डे पडले असल्याची माहिती असून  रेतीची मोठी तस्करी यांच्याच माध्यमातून होत असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र आता जिल्हा खनिकर्म अधिकारी. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात ? व कुणावर बडगा ऊगारतात यावर रेती चोरीचे गणित उलगडणार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा