You are here
Home > चंद्रपूर > आश्चर्यजनक:- वडा रेती घाटावर रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्याची मोजणी व रेती तस्करावर कारवाई होणार  केंव्हा ?

आश्चर्यजनक:- वडा रेती घाटावर रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्याची मोजणी व रेती तस्करावर कारवाई होणार  केंव्हा ?

ज्यानी व्हिडिओ काढला आणि ज्यांचे ट्रक्टर रेती घाटावर होते ते मोकाट कसे ? महसूल विभाग नेमकी कारवाई करताहेत तरी काय.

रेती चोरी प्रकरण भाग – २

घूग्गूस परिसरातील वडा रेती घाट रेती तस्करी करण्याचा रेती तस्करांसाठी मोठा अड्डा बनला असून या रेती घाटावर रेती तस्करानीं केलेले मोठ मोठे खड्डे याचे मोजमाप झाले तर रेती तस्करानी नेमकी किती रेती चोरी केली आणि त्यामूळे शासनाचा किती महसूल बुडाला याचा अंदाज येऊ शकतो. मात्र आता महसूल विभाग पावसाच्या प्रतीक्षेत असून मोठा पाऊस आल्यास रेती घाटावरचे खड्डे बूजेल आणि आपले पाप लपविल्या जाईल अशीच योजना महसूल विभागाची असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवला जात असताना स्थानिक पटवारी, मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार, तहसीलदार हे रेती तस्कराकडुन पैसे घेवून त्यांना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल्याने प्रिया झामरे सारख्या बल्लारपूरात सामजिक कार्यात काम करणाऱ्या महिलेला जिल्हाधिकारी यांना भेटून घूग्गूस सारख्या राजकीय मोठा वारसा असणाऱ्या ठिकाणी अधिकाऱ्याची भूमिका करावी लागली ही फार मोठी शोकांतिका असून या वडा रेती घाटाच्या प्रकरणाकडे आता राजकीय व पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
ज्या दिवशी सकाळीच प्रिया झामरे आणि त्यांच्या चमुने वडा रेती घाटावर धाड टाकली तेंव्हा स्थानिक पोलिस पाटील पण उपस्थित होते अशी माहिती आहे. शिवाय या घटनेची चित्रफीत सुद्धा व्हायरल झाली आहे अर्थात या घटनेचा व्हिडिओ कुणी काढला ? नेमके या ठिकाणी किती ट्रक्टर होते? प्रिया झामरे यांनी कुणाला पैसे मागितले ? त्यांना पैसे देणारे कोण होते ? आणि अर्जदार यांना समोर करून मागे समझोता करणारे ते रेती तस्कर नेमके कोण होते ? या सर्व बाबी तपासाच्या द्रुष्टीने अतिशय महत्वाच्या असून तहसीलदार यांच्या भ्रष्ट भूमिकेमुळे रेती तस्कराना नेहमीच अभय देण्यात आले असल्याने आता या प्रकरणात जेसीपी मशीन,हायवा ट्रक व ट्रक्टर, चे मालक  मोबीण खान आणि ज्यानी विडिओ काढल्याची चर्चा आहे ते नवीन सिंह यांच्या भूमिकेची चौकशी सुद्धा होणे गरजेचे आहे. आता प्रिया झामरे यांचेवर ज्याप्रकारे रेती तस्कराना खंडणी मागितली व त्यांनी अधिकारी असल्याचा बनाव केला आणि प्रशासनाची दिशाभूल केली शिवाय रेती तस्कराकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे तर मग प्रत्यक्षात रेती घाटावर जे ट्रक्टर होते काही ट्रक्टर आजूबाजूला होते एवढेच नव्हे तर रेती घाटावर काही रेती तस्कर होते त्या सर्वावर गुन्हे दाखल का करण्यात येत नाही ? काय महसूल प्रशासन आपली कमजोरी लपविण्यासाठी रेती तस्कराना वाचवीण्याचा प्रयत्न करीत आहे ? हे प्रश्न अतिशय गंभीर असून शासनाचा महसूल बुडविण्यात स्वतः महसूल विभागाचे अधिकारी जर गुंतले असेल तर  ते रेती चोरी करणाऱ्यांना अडविणार कसे ? कारण कुठलेही चोरीचे मोठे काम हे प्रशासनाच्या मर्जीशिवाय होणे शक्य नाही व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पैसे मिळाल्या शिवाय ते चोरीचे काम होणे शक्य नाही त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या पटवारी,मंडळ अधिकारी.नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्यासह खनिकर्म विभागाचे अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा