You are here
Home > कृषि व बाजार > गोंडपिंपरी नगरपंचायतच्या बेकायदेशीर विकासकांमात कंत्राटदारांच्या उलट्या बोंबा ?

गोंडपिंपरी नगरपंचायतच्या बेकायदेशीर विकासकांमात कंत्राटदारांच्या उलट्या बोंबा ?

गोंडपिंपरी(प्रतिनिधी)गोंडपिंपरी नगरपंचायत मधे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अपक्ष नगराध्यक्षाच्या हातात सूत्रे आली. पण तब्बल एक कोटी रुपये विकासकामांवर खर्च करणे बाकी असल्याने ह्या विकासकामांची जर नव्याने मंजुरी आणि त्या कामांची निविदा काढली तर सत्ताधारी यांच्या आदेशाने काम चालेल व आपल्याला त्या कामाचे कंत्राट मिळणार नाही म्हणून उपनगराध्यक्ष यांचे चिरंजीव आणि एका विद्यमान सभापती यांचे मामा यांनी संगनमत करून तब्बल 9755000/रुपयाची विकासकामे निविदा न काढताच जुन्या निविदेच्या आधारावर बेकायदेशीर सुरू केल्याने ह्या प्रकरणी मनसेचे राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देवून बेकायदेशीर सुरू असलेली विकास कामे बंद करा व दोषी नगरसेवक व अधिकारी यांची चौकशी करून त्यांचेवर सुद्धा निलंबनाची करवाई करा अशी मागणी पत्रकार परिषध घेवून केली होती. त्याची दखल घेवून सादर कामे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे आता आपले कंत्राट जावून सुरू केलेल्या कामात लाखो रुपये गुंतले असल्यानेच त्या कंत्राटदारांनी प्रवीण नावाच्या एका नगरसेवकांने त्या कामावर आक्षेप घेतल्याने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार गोंडपिंपरी येथे घडला आहे या संदर्भात संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण देवून जे नगरसेवक व मनसेचे राजू कुकडे यांनी हे प्रकरण बाहेर काढले त्यांना बदनाम करण्याचे छडयण्त्र कंत्राटदार व त्यांना साथ देणारे नगरसेवक व सभापती करीत असल्याने त्यांच्या ह्या चोरांच्या उलट्या बोंबा सुरू आहे असेच एकूण वातावरण गोंडपिंपरी शहरात बघावयास मिळत आहे ….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा