You are here
Home > कृषि व बाजार > गांधी चौकात पाण्याच्या एटीएम ला स्थानिकांचा विरोध !

गांधी चौकात पाण्याच्या एटीएम ला स्थानिकांचा विरोध !

गडचाण्दुर (प्रतिनिधी ) नगरपरिषद गडचांदूर तर्फे गांधी चौकात वॉटर फिल्टर प्लांट ए टी एम बसविण्याकरिता तेरा बाय चौदा ची पक्की खोली बांधकाम करण्याकरिता ठराव घेतला आहे परंतु शह

रात कोणत्याही सभा घेण्यासाठी,पोळा उत्सव,तान्हा पोळा उत्सव, गणेशोत्सव, झेंडावंदन इत्यादी सर्व कार्यक्रम गांधी चौकात होत असते।या शिवाय इतर मुख्य चौकात विशेष जागा उपलब्ध नाही।सदर खोलीचे बांधकाम मधोमध केल्यास अडथळा निर्माण होणार आहे । राजकीय सभा सामाजिक कार्यक्रम याच चौकात होत असतात त्यामुळे सदर खोलीची जागा बदलवून कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही अशा योग्य ठिकाणी वॉटर ए टी एम लावण्यात यावे अशी मागणी अष्टविनायक गणेशोत्सव समिती तथा परिसरातील नागरिकांनी केली आहे । गांधी चौकात एका बाजुला रझा मस्जिद, दुसऱ्या बाजूला विठ्ठल मंदिर, पंचशील ध्वज, गांधी चौकाचा ओटा असून गावातील मुख्य केंद्र स्थळ आहे।
गडचांदूर शहरात विकास निधीतून पाच ठिकाणी थंड पाण्याचे वॉटर एटी एम लावण्यात येणार आहेत परंतु शासकीय निधीचे योग्य नियोजन न केल्यास जनतेला सोय होण्याऐवजी त्यापासून त्रास होऊ शकतो, या कडे नगर सेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे।न प च्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांचेवर नगरसेवक वा अधिकारी यांचा वचक दिसून येत नसल्याने किंवा मिलीभगत असल्याने हे कर्मचारी आपल्या मनमर्जीने अधिकाराचा गैरवापर करून अतिरेकपणा करीत असल्याचे चित्र दिसून येत असून त्यांचे बद्दल गावात तीव्र रोष व्यक्त होत आहे। दिनांक 10 एप्रिल ला याची प्रचिती नागरिकांना पाहण्यास मिळाली।
तसेच सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे व थातुरमातुर सुद्धा करण्यात येत आहे या कडे न प मुख्याधिकारी ने लक्ष न दिल्यास शासकीय निधीचा अपव्यय होणार आहे।
गांधी चौकातील बांधकाम म्हणजे निव्वळ देखावा असून लगत च्या मालमत्ताधारक यांचे जागेसमोर पक्या खोलीचे बांधकाम करणे हा सुद्धा अन्याय करणारा असल्याने नागरिकांनी गांधी चौकात अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामास तीव्र विरोध नोंदवून बांधकाम रोखले व योग्य जागेची निवड करण्याबाबत मुख्याधिकारी यांना अर्ज दिला । योग्य तोडगा काढून बांधकाम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते उध्दव पुरी,वैभव गोरे , बळीराम हेपट, वासुदेव गाणफाड़े,सदाशिव गिरी, निखिल एकरे, बंडू चौधरी, मयुर एकरे, विठ्ठल पुरी,मेघराज एकरे,लीलाधर काळे, संजय कोंडबतुलवार ,
सतीश बिडकर, खुशाल कोंडबतुलवार, भारत भारती, बाळू गिरी,तथा परिसरातील सूज्ञ महिलां पुरुषांनी एका निवेदन द्वारे केली आहे ।याची प्रतिलिपी पोलीस निरीक्षक यांना सुद्धा देण्यात आली आहे ।

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा