You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :- पोलिसांची दारू माफियाच्या विरोधातील मोहीम गाड्यांच्या रडारवर.

धक्कादायक :- पोलिसांची दारू माफियाच्या विरोधातील मोहीम गाड्यांच्या रडारवर.

दारू तस्कराच्या मोहल्ला कमेटिच्या संचालक असलेल्या ईलियास शेख, तिरुपती झाडे रवी आंबोरकर यांच्या गोलू वर्मा. महेश कांबळे या मोरक्याच्या गाड्या पोलिसांच्या कब्जात?

चंद्रपूर :-

जिल्ह्यात दारूबंदी केवळ छोट्या दारू विक्रेत्यांना बंधनकारक असून मोठ्या दारू विक्रेत्यांना मात्र फरार राहून सुद्धा अवैध दारूचा व्यवसाय करण्याची सूट असल्याचे चित्र सद्ध्या दिसत आहे. चंद्रपूर शहरातील शास्त्री नगर बंगाली कैम्प चौक परिसरात
१२ जुलै ला एक मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती ज्यात इलीयास शेख, राहुल चौधरी आणि वणी येथील सोनू जयस्वाल यांना आरोपी बनवून दारू सह एकूण १८४००००/- चा मुद्देमाल जब्त करण्यात आला होता मात्र इलीयास शेख अजूनही फरार आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे असे असताना महेश कांबळेच्या   घराजवळ ज्या गाड्या पोलीसानी तिरुपती झाडे यांच्या असल्याच्या कारणावरून ऊचलल्या त्यात १२ जुलै च्या दारू गुन्ह्याचा सबंध काय ? हा प्रश्न सुद्धा उभा राहत असून पोलिसांकडून अधिक्रुत माहिती प्रसारमाध्यमांकडे येत नसल्याने पुरता गोंधळ उडाला असून नव्या अवैध दारू विक्रीच्या नियमानुसार मोहल्ला कमेट्या बनल्या त्यावरून तर गाड्या उचलण्याची कारवाई झाली नसेल ? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ते एकीकडे फरार दाखवल्या जात आहे तर त्यापैकी काही आरोपी शहरात फिरत असल्याची चर्चा आहे. असे असले तरी अजूनपर्यंत दारू माफिया अमित गुप्ता ज्यानी एका पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर हमला केला तो अजूनपर्यंत फरार आहे आणि पोलिस त्याला शोधू शकत नाही तर सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचे काय ? हा विषय गंभीर बनला आहे. आता या दारू प्रकरणात नेमकी कुठली ? कुणावर ? व कशी कारवाई होते व दारू व्हायरस चे संक्रमण होऊ नये या करिता साखळी कशी तोडल्या जाते हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा