
वरोरा तालुक्यातील वंधली येथील धक्कादायक घटना.
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील माढेळी रोडवरील वंधली या गावात काल रात्रीला एक भयंकर अशी घटना घडली असून पती सुभाष धोटे यानी त्याच्या सरला नावाच्या पत्नीचा रात्रीला गळा दाबून निर्दयीपणे खून केला आणि आपल्या क्रूत्याचा पश्चात्ताप झाल्याने घराला कुलूप लावून स्वतःही विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो वाचवला असून चंद्रपूर येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इकडे गावात स्मशान शांतता पसरली असून म्रूतक सरला वर गावातील नागरिकांनी अंत्यसंस्कार करून तिला अग्नी दिला.