You are here
Home > गडचिरोली > धक्कादायक :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी रोपवन न लावता जिल्हा विकास योजनेंतर्गत मिश्र रोपवन जांभूरखेडा चा निधी केला हडप.

धक्कादायक :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी रोपवन न लावता जिल्हा विकास योजनेंतर्गत मिश्र रोपवन जांभूरखेडा चा निधी केला हडप.

वनविभाग वडसा व वनपरिक्षेत्र कुरखेडा च्या जांभूरखेडा नियतक्षेत्रात लाखोंचा घोटाळा आला झाला उघड ? प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी.

कुरखेडा प्रतिनिधी :-

एकीकडे ३३ कोटी झाडे लावण्याचा शासनाचा उपक्रम फसल्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात असताना वन विभाग मात्र या चर्चेला निरर्थक ठरवत आहे. परंतु जिल्हा विकास योजनेंतर्गत मागील सन २०१९ मधे वडसा वनविभाग व कुरखेडा वनपरिक्षेत्रात जवळपास २५ हेक्टर मधे अंदाजे २७५०० झाडे लावण्याचे लक्ष होते तिथे झाडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मग खरोखरंच ३३ झाडे लावल्या गेली असेल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात मौका चौकशी केली असता त्या कुरखेडा वनपरिक्षेत्रात जवळपास २ हजार खड्डे खोदून असल्याचे दिसत आहे मात्र २७५०० पैकी एकही झाड तिथे बघावयास मिळत नाही तर मग ती  झाडे गेली कुठे ? हा प्रश्न गंभीर असून वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांनीच रोपवन न लावता सगळा निधी हडपला व  हा मोठा घोटाळा केल्याची माहिती आहे.अर्थात कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी आपल्या आर्थिक स्वार्थासाठी संपुर्ण जंगलच गिळंकृत करण्याचा धक्कादायक प्रकार केल्याने या रोपवन क्षेत्राची उच्चस्तरीय चौकशी करून सोनटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करावा व  त्यांच्या कडून आजपर्यंत झालेल्या सर्व कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा