You are here
Home > वरोरा > विविध कार्यकारी सहकारी संस्था टेमुर्डा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावर हेरफेरी प्रकरणात कारवाई होणार कधी ?

विविध कार्यकारी सहकारी संस्था टेमुर्डा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावर हेरफेरी प्रकरणात कारवाई होणार कधी ?

सहाय्यक निबंधक वरोरा हे दोषी संचालकांची का करत आहे पाठीराखण ?

वरोरा प्रतिनिधी :

टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवाचा रासायनिक खत घोटाळा आता पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्यापर्यंत पोहचला असताना सहाय्यक तालुका निबंधक हे त्या संचालक पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने संस्थेच्या सभासदांमधे तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सहाय्यक तालुका निबंधक यांना रासायनिक खताचा प्रत्यक्ष तपासणी अंती कमी आढळून आलेला स्टॉक मालासंबंधाने संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष, व्यवसथापक व रासायनिक खत विक्रेता यांना विचारणा केली असता, संस्था रासायनीक खत विक्रेता राहुल काळे यांनी रासायनीक खताची उधारीवर विक्री केलेली असुन सदर उधारीची रक्कम संबधिताकडुन न आल्यामुळे सदर मालाची विक्री बुकात नोंद घेवुन स्टॉक माल नोंदवहीमध्ये कमी करण्यात न आल्याने नोंदवहीत सदर रासायनिक खत साठ्याचा फरक दिसुन येत असल्याचे सांगीतले. याबाबत रासायनीक खत विक्रेता राहुल काळे यांचे लेखी बयान नोंदविण्यात आलेअसुन संस्थेतील विद्यमान संचालक मंडळ यांचे तोंडी सुचनेनुसार व स्वमर्जीने संस्थेच्या सभासदांना उधारीवर माल विकल्याचे बयानात नमुद केलेले आहे. मात्र सदर साठा फरकाची विक्रीदराप्रमाणे होणारी रक्कम मला मान्य असुन उधारीची रक्कम संबधीताकडुन वसुल करुन संस्थेत जमा करण्यास मला दिनांक २६/०५/२०२० पर्यत मुदत देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. तथापी संस्था व्यवस्थापक यांना खत व बियाणे संबंधातील फरकाची रक्कम खत विक्रेता राहुल काळे यांचेकडून संस्थेत दिनांक २६.०५.२०२० पर्यंत जमा झाले किंवा कसे याबाबत विचारणा केली असता, सदरची रक्कम दिनांक २६/०५/२०२० पर्यंत वसुल झालेली नसल्याचे त्यांनी कळविले आहे.तरी सुद्धा दिनांक १९/०५/२०२० रोजी संस्था गोदामात उपलब्ध असलेल्या रासायनिक खत माल साठ्याची प्रत्यक्षात मोजणी करता रासायनिक खत स्टॉक रजिस्टर नुसार दिसुन येत असलेला रासायनिक खताचा शिल्लक साठा आणि संस्था गोदामात प्रत्यक्ष उपलब्ध असलेला रासायनिक खताचा शिल्लक साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत/तुट आढळुन आलेली असुन रासायनिक खतांचा शिल्लक साठा कमी आढळून आलेला होता.त्यामुळे कमी आढळुन आलेल्या रासायनिक खताचा स्टॉक मालाची विक्रीदाराप्रमाणे होणारी एकुण रक्कम रु. २५,९४,६२८/- असुन यास संस्थेचे रासायनिक खत व बियाणे विक्रेता विभागप्रमुख राहुल काळे तसेच सदरह उधारीचा गैरव्यवहार संस्था पदाधिकारी (अध्यक्ष , उपाध्यक्ष) आणि संस्था संचालक मंडळाचे सहमतीने करण्यात आलेला असल्याने तसेच सदरहु गैरव्यवहाराची रक्कम वसुल करणेबाबत संस्था पदाधिकारी तसेच संचालक मंडळाने संस्था उपविधीनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास कसुर केला असल्याकारणाने संस्था रासायनिक खत विक्री व्यवहारामध्ये संस्थेला झालेल्या नुकसानीस संस्थेचे पदाधिकारी तसेच समस्त संचालक मंडळ जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसत आहे पण सहाय्यक तालुका निबंधक यांनी मागील दोन महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलिस स्टेशन मधे संचालकांच्या रासायनिक खत हेरफेरी प्रकरणाची तक्रार न देता संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांना वाचवीण्याचा प्रयत्न चालविला असल्याने या प्रकरणी या संस्थेचे सभासद सहायक तालुका निबंधक यांच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा