You are here
Home > कोरपणा > धक्कादायक :- गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाच्या गलथानपणामुळेच पॉझिटिव्ह रुग्णांची वाढली संख्या,

धक्कादायक :- गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाच्या गलथानपणामुळेच पॉझिटिव्ह रुग्णांची वाढली संख्या,

बाहेरून आलेल्या व्यक्तीला  संस्थागत विलगिकरनात न ठेवता सोडून दिल्याने वाढला धोका, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड यांनीही ओढले ताशेरे भाजप पदाधिकारी यांची माहिती !

गडचांदूर प्रतिनिधी :-

सुरूवातीला जेव्हा कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हा गडचांदूर येथील संबंधित कोरोना योद्धा अहोरात्र काम
करीत असल्याचे दिसत होते.परंतु आता रुग्ण वाढत असताना यांच्याकडून अक्षम्य हलगर्जीपणा व गलथानपणा का होत आहे ? हे कळायला मार्ग नसून आजच्या घडीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गडचांदूर शहरातील जनतेचा आक्रोश नगरपरिषद प्रशासनाविरोधात आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

गडचांदूर शहरात जेव्हा एकूण 8 कोरोना रुग्ण सापडले होते त्यापैकी नुकतेच 19 जुन रोजी मिळालेला रुग्ण हा अमरावतीतून गडचांदूर येथे त्याच्या सासुरवाडीला आला होता.तो येताच नियोजित ठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून स्वॅब नमुने घेऊन नियमानुसार त्याला येथील बालाजी सेलिब्रेशन नामक कारेंटाईन सेंटर येथे कारेंटाईन केल्याची माहिती आहे.परंतु नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदरकर व कर्मचारी प्रमोद वाघमारे यांनी त्या रुग्णाला येथील अतिशय दाट वस्ती असलेल्या प्रभाग क्रं.7 याठिकाणच्या सासुरवाडीला जाण्याची परवानगी दिली.सदर ठिकाणी बहुतेक सर्वच मोलमजुरी करणारे आहे.17,18 व 19 जुलै रोजी अंदाजे तीन वाजेपर्यंत सदर रुग्ण हा राजरोसपणे शहरात फिरत असल्याची माहिती असून 19 जुलै रोजी सकाळी 9/30 वाजता रिपोर्ट येऊनही त्याला तत्काळ ताब्यात न घेता नगरपरिषद आरोग्य विभागाने त्याला सायंकाळपर्यंत म्हणजे अंदाजे 4 ते 5 वाजेपर्यंत ठेवून नंतर त्याला ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे नेण्यात आले. पण त्याचा संपर्क त्याच्या घरातील व्यक्ती सोबत व शेजाऱ्यांसोबत झाल्याने त्या सर्वांना तपासणीसाठी बोलवण्यात आले. पण ते सर्व लोक पायदळ बाजारातून गेले आणि पायदळ घरी येताना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आले. त्यामुळे अर्थातच ते कित्येक लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने घरातील व आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची तपासणी करणे आवश्यक होते व त्या सर्वाना नगरपरिषद आरोग्य विभागाने त्यांना नेतेवेळी गाडीचा वापर आणि रूग्णालय अथवा नगरपरिषदेचा एखादा जबाबदार व्यक्ती सोबत असने गरजेचे होते. मात्र नियमानुसार लगेच सदर परिसर सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आले.त्यामुळे तेथील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला परंतु जर अगोदरच त्या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण मधे ठेवले असते तर तो परिसर कंटेंन्टमेंट झोन घोषित करण्याची गरज भासली नसती तसेच इतर लोकांची तपासणी,परिसर सील करण्यासाठी नगरपरिषदेचा खर्च व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला नसता, आता तर त्या नगरपरिषद प्रशासनाच्या चुकीमुळे स्वच्छता ठेकेदाराचे मजूर गेल्या 15 दिवसांपासून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून  याच कामात गुंतल्याने स्वच्छतेकडे सर्रास दुर्लक्ष होत असून शहरात बऱ्याच प्रभागात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे कोरोना सोबतच आता लोकांना अनेक रोगांचा सामना करण्याची वेळ येणार तसेच यापूर्वी सुद्धा प्रभाग क्रं.3 मधील डॉ.खेकडे परिसरात रुग्ण आढळल्याने तो परिसर सील करण्यात आला होता, मात्र तेथील काही नागरिक शासन नियमांचे उल्लंघन करत क्षेत्राच्या बाहेर जाऊन विविध कार्यक्रमात उपस्थीत राहत होते.परंतु नगर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही जेव्हा काही नागरिकांनी नगरपरिषदला यासंदर्भात विचारणा केली तेव्हा केवळ दोन व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाई करण्यात आली.याबरोबर बरेच आरोप गडचांदूरातील न.प.प्रशासन व डॉक्टरांवर करण्यात आले असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजप तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोरपणा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदना तून भाजप पदाधिकारी सह नगरसेवक अरुण डोहे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा