You are here
Home > चंद्रपूर > उपक्रम :- फाऊंडेशनच्या माध्यमातून पाचवी ते नववी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनींना नोट्सबुक वितरण.

उपक्रम :- फाऊंडेशनच्या माध्यमातून पाचवी ते नववी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनींना नोट्सबुक वितरण.

श्रिमंतयोगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन श्याम नगर, चंद्रपूर मिञ परिवाराचा उपक्रम !

चंद्रपूर:-

जगात कोरोना च्या संक्रमणाने संपूर्ण जग भीतीच्या सावटात सापडले असताना शिक्षणाचा पूर्णतः बोजवारा झाला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढून गरिबांच्या मुलांना पाठ्यपुस्तक कशी घ्यायची हा प्रश्न आवासून समोर असल्याने श्रिमंतयोगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन श्याम नगर, चंद्रपूर मिञ परिवारातर्फे एक उपक्रम राबवून दि. 26-7-2020 रोजी कोविड- 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता काही गरजूंना रोजगार नसल्यामुळे गरजूंच्या मुलांना शिक्षणामध्ये एक छोटीशी मदत म्हणून फाऊंडेशनच्या माध्यमातून पाचवी ते नववी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनींना नोट्सबुक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ. विनीत दुबे सर(चर्मरोग तज्ञ) डॉ सौ रितु दुबे डॉ उमेश अग्रवाल (नेञ तज्ञ) डॉ रिमांशु तावाडे(जनरल फिजिशीयन) तसेच फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नोट्स बुक वाटप करण्यात आले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फाऊंडेशनच्या विधी सल्लागार अँड सारिकाताई स. संदुरकर आणि इंजिनीअर अतुलभाऊ खनके डाॅ. महेश गिरडकर व डाॅ.विनित दुबे सर यांच्या सहकार्याने नोट्स बुकची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे डॉ रिमांशु तावाडे यांच्या हस्ते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मास्क वितरण केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे तसेच फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांचे आभार प्रदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ संदुरकर यांनी मानले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा