You are here
Home > वरोरा > आंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.

आंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.

ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता जिल्हा काँग्रेस असंघटित. कामगार विभाग यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत धरणे आंदोलन

वरोरा:-

ऑटो चालक मालक यांच्या विविध मागण्या घेवून दिनांक 28/72020 रोजी सकाळी 11 वाजता शहीद योगेश डाहुले(नागपूर नाका) चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर.येथे, सदर आंदोलन हे .प्रदेशाध्यक्ष बद्री जामाभाई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार व.खासदार बाळु भाऊ धानोरकर .आमदार प्रतिभाताई धानोरकर .आमदार सुभाष भाऊ धोटे. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे .यांच्या मार्गदर्शनात , काँग्रेस असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष तथा सभापती. शेख जैरूउद्दीन (छोटू भाई)वरोरा नगर परिषद यांच्या नेतृत्वात वरोरा विभागीय कोरोना महामारी लाकडाऊन मुळे महाराष्ट्रातील नागरीक सम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विभाग. बेजार झालेल्या ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन चे आयोजन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनात शंभर ते दीडशे चालकानी सक्रिय सहभाग दर्शवून सहकार्य केले. व आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा धारकांना आरटीओ द्वारा आकारण्यात येणारी वार्षिक नूतनीकरण सह अन्य शुल्क व नोंदणीकरन शुल्क एक वर्षाकरिता माफ करण्यात यावे, ऑटोरिक्षा व्यवसाय करिता कर्ज घेतलेला ऑटो चालकांना सहा महिन्याकरिता मासिक हप्ते व मासिक हप्त्या वरील लागणारे व्याज माफ करण्यात यावे असे आदेश सर्व बँक फायनान्स कंपनीनां देण्यात यावी, तसेच ऑटो रिक्षा चालकांसाठी इतर कल्याणकारी महामंडळ याप्रमाणे ऑटो रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे.
महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालक यांना न्याय योजनेअंतर्गत अंतर्भूत करून 7500 रुपये प्रति महिना राज्य शासनाने लागू करावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ठरविण्यासाठी सरकारी यंत्रणा हटविण्यात आल्यावर किमतीमध्ये वाढ होते त्याप्रमाणे कच्च्या तेलाच्या ठरलेल्या भावानुसार प्रवासी वाहतूक भाडे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये केंद्रीय समिती गठीत करण्यात यावी.महाराष्ट्र राज्यात /१० ऑटो चालकांनी आत्महत्या केली आहे, या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य द्यावे. या लॉक डाऊन काळातील आलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्यात यावे.सुरु असलेल्या लाकडाऊन काळात ऑटो रिक्षा चालक मालक यांना शासकीय योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात यावा व त्यांची मुले खासगी शाळेत इंग्रजी माध्यमात शिकत आहे त्यांची फीस माफ करण्यात यावी यासह विविध मागण्याचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांचेकडे उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब यांच्यामार्फत पाठविण्यात आले तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हा, बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर जिल्हा आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांना पाठविण्यात आले.यावेळी धरणे आंदोलनात व निवेदन देताना काँग्रेस कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सभापती नगर परिषद वरोरा शेख जैरुद्दिन छोटूभाई, वसंतराव विधाते जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूर, सौ सुनंदा जिवतोडे, जिल्हा परिषद सदस्य. मेहबूब हसन जिल्हा उपाध्यक्ष, गिरधर कष्टी तालुका खरेदी-विक्री संस्थाध्यक्ष, तसेच विदर्भ फेडरेशन चालक-मालक ऑटो संघटनेचे अध्यक्ष अरवींद तिखट, प्रमोद धोपटे, उपाध्यक्ष.मधुकर राऊत, सचिव बाबा खंडाळकर. विलास पेंदे, मधु चिकनकर तसेच युवा ग्रामीण प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष.दादाराव काकडे, सचिव, राकेश सोनानी. रवींद्र पावडे, रविंद्र रंगारी, सतीश वाटकर, मधुसूदन चिकनकर, राजू खुटारकर, उमेश पेंदोर, रवी सहारे, आदी आॅटो चालक-मालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा