You are here
Home > चंद्रपूर > क्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

क्राईम :- ब्रम्हपुरी क्षेत्रातील नदी पात्रातून रेती माफीयांची वाळू चोरी जोरात , मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

तहसीलदार पवार यांच्या अर्थपूर्ण पाठबळाने रेती माफीयांची दादागिरी ? ग्यांगवॉर होण्याची भीती?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

ब्रम्हपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव येथील नदी पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना व लिलाव झाला नसताना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे. दररोज सुमारे शंभर ट्क पेक्षा जास्त वाळू वाहतूक सर्रासपणे करण्यात येत असताना सुद्धा तहसीलदार पवार यांचे रेती माफियांना पाठबळ आहे त्यामुळे तहसील प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पालकमंत्र्यांच्या कार्य क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने प्रकरण गंभीर बनले असून यात शहरातील काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे. आणि त्यांच्याकडूनच अवैध वाळू चोरी करण्यात येत आहे. खरं तर रेती माफियांची हद्द तर तेव्हा झाली जेंव्हा नदी पात्रात चाळू उपसा व वाहतूक करण्याकरिता कुणीही आडकाठी आणू नये यासाठी चक्क बाहेरील गुंड आणण्यात येतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक युवाराष्ट्र मध्ये वाळू तस्करांकडून अनेकांचे मुडदे पडण्याची भीती’ या मथळ्याखाली दिनांक २३ जुलै ला प्रकाशित झाले आहे. मात्र प्रशासनाला याबाबद माहिती असूनही कोणतीही कारवाई का करण्यात येत नाही ? हा कळीचा मुद्दा सद्ध्या चर्चेचा विषय बनला आहे.  याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त नागपूर विभाग, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती ब्रम्हपुरी मनसे तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की
रेती माफीयावर उचित कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकासुद्धा आम्ही दाखल करणार आहोत असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे. यावेळी  मनविसे  जिल्हा अध्यक्ष  राहुल बालमवर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राज कुकडे, तालुका अध्यक्ष  सूरज शेंडे, तालुका संघटक  मनोज तांबेकर, नितीन पोहरे तालुका उपाध्यक्ष ब्रह्मपुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा