You are here
Home > गडचिरोली > सनसनिखेज:- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी रोपवन न लावता हडपला लाखोंचा निधी?

सनसनिखेज:- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी रोपवन न लावता हडपला लाखोंचा निधी?

केवळ खड्डे खोडून  झाडे लावण्याचा केला खोटा देखावा, वन समित्यांच्या घोटाळ्याची मालिका घेणार वन अधिकारी यांचे बळी. 

कुरखेडा प्रतिनिधी :-

रोपवन न लावता कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी पुर्ण निधी हडप केल्याचा सनसनिखेज प्रकार समोर आला असताना सुद्धा वन विभाग आला अधिकारी झोपेचे सोंग घेवून गप्प का आहेत ? हा प्रश्न गंभीर बनला आहे.
खरं तर या प्रकारामुळे वन परिक्षेत्र अधिकारी सोनटक्के हे आपल्या अर्थ व्यवहाराने संपुर्ण जंगलच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात की काय ? असाच प्रकार दिसत आहे, सोनटक्के यांनी सन २०१९ मध्ये कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या जाबुळखेडा वन क्षेत्रात जवळपास २५ हेक्टर मधे जिल्हा विकास योजनेंअंतर्गत अंदाजे २७५०० झाडे लावण्याचे लक्ष पूर्ण केल्याचे दाखवले मात्र सदर झाडेच गायब असल्याचा प्रकार प्रत्यक्ष पाहणी नंतर समोर आल्याने वन परिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचे बिंग फुटले. असे असले तरी ही बातमी बाहेर येवू नये म्हणून स्वतः सोनटक्के यांनी सर्वत्र बंदोबस्त केल्याची चर्चा आहे. महत्वाची बाब म्हणजे या संदर्भात मौका चौकशी वरिष्ठ अधिकारी का करीत नाही ? हा मोठा प्रश्न असून या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सुद्धा गुंतले असल्याची चर्चा सुद्धा होताना दिसत आहे. मात्र या गंभीर प्रकारा नंतर सोनटक्के यांची यापुर्वीच्या पूर्ण कामांची चौकशी केल्यास आणखी मोठी घोटाळे समोर येवू शकते. एका विशेष सूत्रानुसार सोनटक्के यांनी वन विभागात भ्रष्टाचार करून मोठी माया कुठे कुठे जमवली याची संपूर्ण माहिती समोर येण्याची चिन्ह आहे.तर दुसरीकडे वन समित्यांमधे झालेला घोटाळा याची मालिका लवकरच सुरू होणार असल्याने वन अधिकारी यांचे बळी जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा