
दारू विकनारे व पिणारे वार्डातील नागरिकांच्या रडारवर.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्हात दारूबंदी झाली तेव्हापासून अवैध दारू विक्रीचे धंदे जोमात सुरू असून खास करुन शहरातील स्लम एरियामधे (गरीब वस्ती ) अनेक बालगुन्हेगार या व्यवसायात गुंतले आहे. असाच प्रकार चंद्रपूर शहरातील नेहरूनगर येथे घडत आहे, शिवाय त्यापासून गवळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अवैध दारू विकेत्याकडू होते आहे.
खरं तर नेहरू नगरामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नेहरू प्रभागातील नागरिकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण कुंपणच शेत खात असेल तर शेताला वाचविणार कोण ? असा प्रश्न सर्वांचाच पडत आहे कारण पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध दारूचे धंदे सुरू असतात आणि म्हणून जोपर्यंत पोलिस या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत नेहरू नगर च काय जिल्ह्यात कुठेच अवैध दारू विक्रीवर पायबंद घालू शकणार नाही पण नेहरू नगर मधील काही सुज्ञ नागरिकांनी चंग बांधला आहे की जर पोलिस प्रशासन अवैध दारू विक्री बंद करणाऱ्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर आम्ही स्वतः दारू विकणाऱ्याचा व दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असा इशारा डिजिटल मिडिया एसोसिएशन च्या पत्रकार परिषदेत नेहरू नगर मधील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला दिला. या प्रसंगी नेहरू नगर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रमोद तिवारी, नेहरू नगरातील, शेषराव सोलंकी,
उमेश सालुंखे, विनोद गुजर, दिनेश मोरे, अरूण भिसे, अरविंद भगाडे, उमेश गुजर, या सोबत नेहरू नगरामधील नागरिक उपस्थित होते.