You are here
Home > गडचिरोली > सनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून ?

सनसनीखेज :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा गडचिरोली येथील बंगला भ्रष्टाचारातून ?

गडचिरोलीतील वडेट्टीवार यांच्या पट्रोल पंपामागील भव्य मोठा बंगला कोटींच्या घरात, एवढा पैसा आला कुठून ? चौकशीची मागणी.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची मालिका सध्या भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित होत असून सामजिक माध्यमांमधे चर्चेचा विषय बनली आहे, परंतु संबंधित वन विभागाला याची माहिती नसावी हे शक्य जरी नसलं तरी सोनटक्के यांनी केलेली जोरदार सेट्टिंग आणि काही पत्रकारांना दिलेली अर्थपूर्ण मेजवानी यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हा गंभीर विषय पोहचला नसावा अशी शक्यता आहे.
25 हेक्टर मधील रोपवन लागवड असो. वन व्यवस्थापन समित्याच्या माध्यमातून समान खरेदी असो की बोगस मजूर दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यावधीची हडप केलेली रक्कम असो सर्व सोनटक्के यांच्या संमतीने आणि पुढाकाराने बोगस कामे होत असताना आता त्यांच्या या सर्व भ्रष्टाचारी मार्गातुन गडचिरोलीतील वडेट्टीवार यांच्या पट्रोल पंपामागील भव्य मोठा बंगला कोटींच्या घरात बांधला गेल्याची माहिती आता समोर आल्याने यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून ? हा प्रश्न विचारण्याची गरज आता कुणालाच भासणार नाही एवढी हमी ही इमारत सगळ्याना देत आहे. त्यामुळे वन विभागात मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधीची माया वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी जमविल्याचे पुरावे असताना वन विभाग गप्प का ? हा सवाल सर्वत्र विचारल्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा