You are here
Home > भद्रावती > क्राईम रिपोर्ट :- मोहसिन याचा अपघात नाही तर त्याच्या जोडीदार आशिष लभाने यांनी केला घातपात.

क्राईम रिपोर्ट :- मोहसिन याचा अपघात नाही तर त्याच्या जोडीदार आशिष लभाने यांनी केला घातपात.

माजरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? बब्बू कुरेशी या पित्याचा पत्रपरिषदेत आरोप?

भद्रावती प्रतिनिधी :-

माजरी पोलिस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, रेती चोरी, सट्टापट्टी आणि इतर कोळसा चोरी प्रकरणाची भरमार आहे, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी वणी व्हाया माजरी या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी ही नित्याचीच बाब आहे अशाच एका दारू तस्करीत मोहसिन कुरेशी हा आपला सहयोगी आशिष लभाने यांच्या सोबत मिळून वणी वरून दारू आणताना दि.22 जून रोजी माजरी कुचना मार्गावर कोराडी नाल्याजवळ अपघात होऊन मृत्यू झाला. मात्र त्याच्या सोबत असलेल्या आशिष ला थोडीशी सुद्धा इजा झाली नाही, एवढेच नव्हे तर स्वतः दारूच्या अवैध धंद्यात सामील असलेल्या आशिष लभाने यांनी मृत पावलेल्या आपल्या सहयोगी मित्राच्या घरी निरोप दिला नाही आणि पोलिसांनी हा अपघात झाला असल्याचे जाहीर केले, मात्र मोहसिन याचा अपघातामुळे नव्हे, तर घातपातात मृत्यू झाला, आणि हे प्रकरण माजरी पोलिसांनी दडपले असा आरोप मृतकाच्या वडिलाने भद्रावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
भद्रावती येथील झिंगुजी वार्डातील रहिवासी बब्बू हुसेन कुरेशी यांचा मुलगा मोहसीन (29) हा त्याचा मित्र आशिष शंकर लभाने याच्या सोबत अवैधरीत्या दारूची वाहतूक करतांना दि.22 जून रोजी माजरी कुचना मार्गावर अपघात होऊन मृत पावला,असे पोलिसांचे म्हणने आहे. मात्र जर मोहसिन हा गंभीर जखमी व त्यानंतर मृत्यू पावला तर त्याच्यासोबत असलेल्या आशिष लभाने याच्या शरीराला काहीच इजा का झाली नाही ? हा प्रश्न अतिशय गंभीर असून पोलिस प्रशासनाच्या चौकशी वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यमुळे आपल्या मुलाचा अपघात नसून घातपातच आहे. असा आरोप मृतकाचे वडील बब्बू हुसेन कुरेशी यांनी केला आहे त्याला बळ मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली असेल तर फक्त त्याच्या गुप्तांगालाच कसा काय मार लागला ? बाकी कुठेच कसा का मार नाही? हाही प्रश्न पोलिसांच्या तपासावर प्रश्न उभा करतोय शिवाय शवविच्छेदन अहवालातही गडबड दिसून येत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्या नंतर दिसून आली कारण आरोपी विरुद्ध कलम 304 (अ) हे माहिती मागितल्या नंतर लावण्यात आले असाही आरोप पत्रपरिषदेत बब्बू कुरेशी यांनी केला आहे . अपघाताच्या प्रकरणाशी संबंधित दस्तावेज मागितले असता एक महिना दस्तावेज दिले नाही.अपघात घडल्याची माहीती आशिषने आम्हास न देता आपल्याच सबंधितांना दिली. त्यामुळे आशिष लभाने यांनीच मोहसिन चा घातपात केला त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याला अटक करावी तरच सत्य परिस्थिती समोर येईल अशी मागणीही पत्रपरिषदेतून करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दारूच्या 55 निपा मोहसीनकडे सापडल्या मग अपघातस्थळी दारूच्या शिशांचा एकही तुकडा का आढळून आला नाही?त्याच्या जवळ निपा होत्या, तर त्याचे तुकडे कसे झाले नाही? असे नानाविध प्रश्न तपास यंत्रणेवर उचलल्या जात आहे. या परिस्थितीमुळे निश्चितच माजरी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशीही मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली.यावेळी
पत्रपरिषदेला मोहसीनची आई बानो बब्बू कुरेशी व मावशी मुन्नी कदिर खान उपस्थित होत्या..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा