You are here
Home > भद्रावती > आश्चर्यच :- तब्बल चार वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक होतांना वाचलेला पोलिस हवालदार भीमराव असा कसा ?

आश्चर्यच :- तब्बल चार वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक होतांना वाचलेला पोलिस हवालदार भीमराव असा कसा ?

पोलिस हवालदार भीमराव पडोळे हा सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याचा साक्षात्कार झालेल्या त्या बातमीदारांचा सत्कार भद्रावतीकर करतील ?

भद्रावती प्रतिनिधी :-

भीमराव पडोळे ऊर्फ बंडू हा पोलिस हवालदार म्हणजे जणू पोलिस विभागाला लागलेली वाळवी आहे असेच एकूण त्यांच्या कामकाज चरीत्रावरुन दिसत असताना भद्रावती शहरातील एका बातमीदारांना भीमराव पडोळे हा सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जातो हा जो साक्षात्कार झाला तो नेमका कशामुळे झाला ? याचा वेध भद्रावती शहरातील जनता घेवून ज्या बातमीदारांला हा साक्षात्कार झाला त्याचा सत्कार करणे आता अती आवश्यक झाले आहे. कारण भीमराव पडोळे ह्या पोलिस हवालदारांचे चित्र आणि च्यारित्र जर भद्रावती पोलिस स्टेशनच्या पोलिस सहकाऱ्यांनाच जरी विचारले तरी बातमीदारांचा होश उडेल पण एकीकडे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित होत असलेल्या मालिका
आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राजकीय मंडळी यांच्याकडून घेण्यात येत असलेली दखल यामुळे भीमराव पडोळे यांच्या पायाखालची जमीन हलली असल्याने त्यांनी आपले नकली चित्र आणि चरित्र पोलिस प्रशासन व राजकीय मंडळी समोर उजळ करण्यासाठी एका बातमीदारांच्या मदतीने प्रयत्न केल्याने त्यांनी पुन्हा स्वतःचीच इभ्रत घालवली असल्याची बाब आता उघड होऊ लागली आहे.
महत्वाची बाब म्हणजे एखाद्या पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांनी बातमी प्रकाशित केल्याने त्याच पोलिस कर्मचाऱ्यांची स्तुती दुसऱ्या प्रसारमाध्यमांमधे होते म्हणजे काय ? ही बाब भद्रावती शहर व तालुक्यातील जनता समजून आहे.

भीमराव पडोळे हे गोपनीय विभागात पासपोर्ट काढणे व्हेरीफिकेशन चरिञ प्रमाणपञ व राजकीय सामजिक कार्यक्रम आंदोलन इत्यादी बाबत फार चांगले काम करीत असून ते देवदूत आहे असा साक्षात्कार सुद्धा त्या बातमीदारांला झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कारण खुद्द भद्रावती पोलिस स्टेशन मधे जनता व पोलिस यांच्यातील समन्वय व्हावा या करिता पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या समक्ष एका नागरिकांनी पडोळे हे पोलिस वेरिफिकेशन च्या नावावर दोनशे पाचशे रुपये घेतात अशी तक्रार केली होती व त्या प्रसंगी भद्रावती नगरपरिषद अध्यक्ष सुद्धा तिथे हजर होते मग भीमराव पडोळे लोकांकडून कामाचे बेकायदेशीरपणे पैसे घेतात म्हणजे सर्वसामान्य जनतेची मदत आहे का ? आणि त्यामुळे आता मदतीची व्याख्याच भीमराव पडोळेसाठी बदलायची का ? हा विचार सुद्धा भद्रावती शहरातील जनतेला करावा लागणार आहे. मात्र भीमराव पडोळे हा त्यांच्या सन 1995 पासून काय काय करामती करीत होता आणि किती आणि कुठे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकता अडकता वाचला याचा जणू लेखाजोखाच सापडला असल्याने भीमराव पडोळे यांच्या खऱ्या चेहऱ्याची ओळख भद्रावती शहरातील जनतेला होणार आहे कारण रक्षकच जर भक्षक होत असेल तर भक्षकाचा अंत म्हणजेच खरी शोध पत्रकारिता असते याचे दर्शन लवकरच होणार आहे ….

One thought on “आश्चर्यच :- तब्बल चार वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक होतांना वाचलेला पोलिस हवालदार भीमराव असा कसा ?

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा