You are here
Home > गडचिरोली > धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या डोक्यावर पोलिसांची टोपी ?

धक्कादायक :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या डोक्यावर पोलिसांची टोपी ?

कुठल्याही वन अधिकाऱ्यांना पोलिसांची टोपी नसते ती वेगळी असते असे जाणकारांचे मत आले समोर ?

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्रात कोट्यावधी चा भ्रष्टाचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी वन विभाग म्हणजे आपली मालमत्ता असे आपले मत करून घेतले आहे. खरं तर ज्या पद्धतीची वन अधिकारी यांना वर्दी असते त्या नुसार आरएफऔ यांना पोलिसासारखी टोपी असते पण सोनटक्के यांनी घातलेली वर्दी बघून कुणीही हे वन अधिकारी नाही तर पोलिस अधिकारी आहे असा समज करून घेईल पण थांबा सोनटक्के यांनी पोलिसांसारखी  टोपी घालून आपला दुहेरी फायदा करून घेण्यासाठी जणू पोलिसांची टोपी वापरली असल्याची माहिती आता उघड झाली आहे. खाकी वर्दीच्या आत भ्रष्टाचाराने अख्खे जंगल पोखरण्याची रणनीती आखणारे सोनटक्के यांनी आपली टोपी बदलली हे खरे असले तरी त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल  वरिष्ठ वन अधिकारी गप्प का ? हा प्रश्नच असून आतातरी वरिष्ठ वन अधिकारी यांनी याबद्दल दखल घ्यावी अशी मागणी होत आहे ….

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा