You are here
Home > गडचिरोली > सनसनिखेज: – प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के यांच्यावर थातूर मातूर नोटीस पाठवून कारवाई चा फॉर्स?

सनसनिखेज: – प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के यांच्यावर थातूर मातूर नोटीस पाठवून कारवाई चा फॉर्स?

मुख्य वन संरक्षक यांच्याकडे अजूनही कार्यवाहीचा अहवाल अप्राप्त. सेटिंग होणार की नाही ? सोनटक्के संभ्रमात.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्रात प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सुनील सोनटक्के यांनी सिमेंट बंधारा बांधकाम, खोदतळे बांधकाम रस्ते बांधकाम, सामान खरेदी व झाडे लावण्याच्या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आता उघड झाले आहे तर कार्यालयीन सरकारी खात्यात सरळ अनुदान प्राप्त रक्कमे अंतर्गत कुरखेडा उपक्षेत्र-०२ नियतक्षेत्र जांभूळखेडा रस्ते बांधकाम, पलसगड उपक्षेत्र-०१ नियतक्षेत्र पिट्टेनकर रस्ते बांधकाम तसेच गोठणगांव उपक्षेत्र-०४ रस्ते बांधकाम करण्यात प्रकरणात सरळ-सरळ कामे न करता ही बिले काढण्यात आली, त्याचप्रमाणे कुरखेडा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पुराडा व बेळगांव रेंज सिमेंवर कृ.नं. ४४९ येथे ३३ केव्ही पाईप लाईनचे काम वनविभागाच्या अखत्यारीत येणारा पहाड खोदुन ही पाईप लाईन टाकण्यात आली, त्यात देवाण-घेवाणीतून हा गैरप्रकार करण्यात आला अशा सोनटक्के यांच्या अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात सोनटक्के दोषी आढळले असून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचता करण्यासाठी जाणिवपूर्वक विलंब केल्या जात आहे. प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांना यासंबंधात ‘शो-कॉस’ नोटीस पाठविण्यात आला असल्याचे कळते.

त्यामूळे या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू होती त्या चौकशीचा अहवाल हा मुख्य वन संरक्षक यांच्या कडे न जाता तो मधातच अडकला कारण सोनटक्के यांना माहीत होते की मुख्य वन संरक्षक यांची बदली होणार त्यामुळे त्यांना मैनेज केले तर समोर त्या खुर्चीवर येणारे मुख्य वन संरक्षक यांना सुद्धा मैनेज करावे लागेल आणि लाखो रुपये याकरिता मोजावे लागतील म्हणून त्यांनी त्यांच्या बदली ची वाट बघितली होती आणि ती झाली सुद्धा पण त्याकरिता सोनटक्के यांनी चौकशी अधिकारी यांना मैनेज करून नवीन मुख्य वन संरक्षक यांना मैनेज करण्याची तयारी सुरू केली त्यातच आता सोनटक्के यांना चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने आपल्यावर कारवाई करण्यात का येवू नये ? याबाबत नोटीस देवून त्यांचे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी त्याचे उत्तर दिले नसल्याचे कळते अर्थात त्यामूळे मुख्य वन संरक्षक व वन विभागाचे मंत्रालय मुख्य सचिव यांच्याकडे हे प्रकरण गेल्यास सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते त्या भीतीने सद्ध्या सोनटक्के हे संभ्रमात असून त्यांनी आजपर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होत असल्याने आता त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल असेच एकूण चित्र दिसत आहे. भुमीपुत्राची हाक या न्यूज पोर्टलकडे सोनटक्के यांचे जुने प्रकरण हाती लागले असल्याने भ्रष्टाचार करून जंगलच गिळंकृत करण्याची मानसिकता ठेवणारेया सोनटक्के यांच्या जगावेगळ्या करामती समोर येणार आहे.
(उद्या वाचा – स्त्री-लंपट सोनटक्के चा नवा किस्सा)

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा