You are here
Home > वरोरा > धक्कादायक :- आसाळा गावातील समाज भवन बांधकामात मोठा भष्टचार, पावसाळ्यात खुलली पोल.

धक्कादायक :- आसाळा गावातील समाज भवन बांधकामात मोठा भष्टचार, पावसाळ्यात खुलली पोल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व कंत्राटदार यांचा झोल ?

तालुका प्रतिनिधी-किशोर डुकरे

वरोरा तालुक्यापासून 16 कि. मी. अंतरावर असलेल्या आसाळा या गावामध्ये आमदार निधीतून माता मंदिराच्या जागेवर 5 लाखाचे समाज भवन बांधकाम मंजूर झाले व ते काम सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्या जवळीक असलेले रवी झोडे यांना मिळाले. ते बांधकाम त्यांनी जवळपास ऑक्टोम्बर महिन्यात सुरु केले आणि त्या काम जानेवारी महिन्यात पूर्ण होऊन ईमारत सुसज्य झाली, पंरतु पावसाळा चालू होताच त्या बांधकामाची पोल खुलली असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व रेती माती मिश्रित असल्यामुळे त्या इमारतीमध्ये पाणी गळती सुरु झाली.या संदर्भात गावातील सामजिक कार्यकर्ते असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्याशी संवाद साधला असता आता आम्ही काहीच करू शकत नाही असे ते म्हणाले याचा अर्थ सामजिक भवन बांधकाम कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी या कामात भ्रष्टाचार करून झोल केला हे स्पष्ट होते त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने आता पासूनच पाणी गळती होत आहे यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंताच गप्प असल्याने गावात मोठा असंतोष निर्माण झाल्याने गावकरी या सामजिक भवन बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा