You are here
Home > भद्रावती > खळबळजनक :- ठाणेदार पवार पेक्षा पोलिस हवालदार भीमराव पडोळेचे कार्य मोठे ? एका न्यूज पोर्टल ने बांधले फटाके.

खळबळजनक :- ठाणेदार पवार पेक्षा पोलिस हवालदार भीमराव पडोळेचे कार्य मोठे ? एका न्यूज पोर्टल ने बांधले फटाके.

पोलीस वेरिफिकेशन च्या नावावर लोकांकडून पैसे घेवून भ्रष्टाचार करणारे भीमराव पडोळे जनतेसाठी देवदूत ठरले कसे ? खुद्द पोलीस प्रशासन संभ्रमात.

भद्रावती प्रतिनिधी :

भद्रावती पोलिस स्टेशन मधे सद्ध्या भीमराव पडोळे म्हणजे सर्वकाही अशी परिस्थिती स्वतः भीमराव पडोळे यांनी न्यूज पोर्टल च्या प्रतिनिधीना पैसे देवून व त्यामधून स्वतःची वहावाही करून  निर्माण केली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक पवार यांना डावलून भीमराव पडोळे यांना मोठे दाखवण्याचा प्रकार नेमका कशासाठी आहे ? त्यामागचे रहस्य काय आहे ? हे समजायला मार्ग नसून गोपनीय विभागात कार्यरत असताना भीमराव पडोळे बाकीच्या अवैध दारू, अवैध रेती वाहतूक, सट्टापट्टी आणि वेळेवर येणाऱ्या तक्रारी संदर्भात जिथे तिथे नाक का खूपसतात ? याबद्दल स्वत ठाणेदार सुद्धा काही बोलायला तयार नाही याचे जणू भद्रावती शहरातील जनतेला आश्चर्य वाटत आहे.

आता जवळपास दोन न्यूज पोर्टल वर भीमराव पडोळे यांच्या कार्याची महती विशद करून ते जनतेसाठी देवदूत असल्याची बातमी आली, ती कशी आली तर स्वतः भीमराव पडोळे यांच्या कार्यालयीन खोलीत त्या न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी बसवून त्यांना त्यांनी स्वतःचा गौरव कसा करायचा याबद्दल माहिती लिहून दिली असल्याची माहिती आहे कारण दोन्ही न्यूज पोर्टल वर देवदूत हा शब्दप्रयोग सारखा आहे शिवाय भद्रावती येथील शिक्षक आशुतोष सुरावार यांच्या पूर्ण कुटुंबांचे व्हेरीफिकेशन करून त्यांच्या मुलीला विदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त अनेकांना पासपोर्ट काढुन दिले असल्याची बातमी सारखी आहे. त्यामुळे भद्रावती पोलिस स्टेशन मधे ठाणेदार पवार हे दुय्यम आहे तर भीमराव पडोळे हेच खरे पोलिस कर्मचारी कर्तव्यदक्ष आहे हे स्वतः भीमराव पडोळे यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भीमराव पडोळे हे ठाणेदाराचे अधिकार वापरतात हे स्पष्ट आहे कारण कुठल्याही पोलीस स्टेशन मधे जर पत्रकारांना बातमी द्यायची असेल तर स्वतः ठाणेदार देतो व ते अधिकार केवळ त्यांनाच आहे मात्र भीमराव पडोळे यांनी ठाणेदारांना डावलून स्वतःची महती गाण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या अनुशासनहीनतेचा परिचय देवून एक प्रकारे गुन्हा केला आहे त्यामुळे असा पोलिस कर्मचारी जो स्वतःची जबाबदारी इमानदारीने पार पाडत नाही शिवाय दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करतो व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकार वापरतो त्याची उचलबांगडी निश्चितच व्हायला हवी कारण भीमराव पडोळे हे भद्रावती पोलिस स्टेशन ला लागलेली वाळवी आहे याची प्रचिती सर्वानाच होत आहे शिवाय अवैध धंदेवाईक यांच्याकडून ठाणेदार यांच्या नावाने हप्ता वसुली करून व पत्रकार प्रतिनिधी यांना पैसे देवून स्वतःची वाहावाही करायचा अधिकार भीमराव याना दिला कोणी ? याचे रहस्य लवकरच उलगडणार आहे शिवाय भीमराव पडोळे काय काय उपद्व्याप करतोय याचे इतिवृत्त क्रमाक्रमाने प्रकाशित होणार असल्याची माहिती आम्हच्या खास बातमीदार यांच्याकडून मिळत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा