You are here
Home > भद्रावती > झोलझाल:- बोगस पत्रकारांच्या माध्यमातून देवदूत बनलेल्या भीमराव पडोळेच्या उलट्या बोंबा ?

झोलझाल:- बोगस पत्रकारांच्या माध्यमातून देवदूत बनलेल्या भीमराव पडोळेच्या उलट्या बोंबा ?

पत्रकारितेत पैशासाठी लाचार बोगस पत्रकारांची फौज तयार झाल्याने भीमराव पडोळे सारख्या भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन ?

भद्रावती प्रतिनिधी :-

सद्ध्या भद्रावती पोलिस स्टेशन मधील कुख्यात पोलिस कर्मचारी भीमराव पडोळे हे बोगस पत्रकारांसाठी देवदूत बनले असल्याची चर्चा आहे. आता हे खरंच देवदूत आहे की जनतेकडून लूट करणारा भ्रष्ट कर्मचारी आहे हे भद्रावती शहरातील जनता आता ठरविणार आहे. या संदर्भात भद्रावती शहरातील जनतेच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून एका वाचकांनी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल मधे “आश्चर्यच :- तब्बल चार वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक होताना वाचलेला पोलिस हवालदार भीमराव असा कसा ?” या आशयाच्या बातमी वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की “हा माणुस पक्का लाचखाऊ असुन त्याच्या कडे येणाऱ्या लोकाना नेहमीच 4…5 वेळा चकरा मारायला लावुन कामे करतो. मी स्वता हा अनुभव अनेकदा घेतला आहे.त्याची इथुन बदली होणे आवश्यक आहे.” खरं तर अशी प्रतिक्रिया केवळ जाहीरपणे एकाने जरी दिली तरी फोन वर अनेकांनी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर वास्तविक बातमी दिल्याबद्दल संपादकांचे धन्यवाद मानले आहे.

एकीकडे जनतेला ज्या भीमराव पडोळे ह्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्रास आहे व त्यांच्या भ्रष्ट लीला वरिष्ठ पोलिस अधिकारी व जनतेसमोर आणण्याचे उद्देशाने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी येत असताना आता भीमराव पडोळे ठाणेदार यांना सुद्धा मागे टाकून स्वतःची वाहवाही करण्यासाठी चक्क बोगस पत्रकारांचा सहारा घेत उलट्या बोंबा ठोकत असल्याची बाब उघड झाली आहे. यावरून भीमराव पडोळे पोलिस प्रशासनाच्या शिस्तीची अवहेलना करीत आहे हे शीद्ध होते, मात्र या संदर्भात ठाणेदार पवार हे जणू संभ्रमात असून त्यांचा भीमराव पडोळे यांना पाठिंबा आहे की काय ? हे कळायला मार्ग नसून जर खरोखरच ठाणेदार लोकांकडून कामाचे पैसे घेणाऱ्या, पोलिस प्रशासनाची आचारसंहिता व शिस्त मोडणाऱ्या भीमराव पडोळे यांना पाठीशी घालत असेल तर ही पोलिस प्रशासनासाठी शरमेची बाब होईल. अर्थात आता ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे गेली असून लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा