
कडक बंदोबस्तात केवळ औषधी दुकाने सुरू परंतु किराणा दुकानासह सर्व दुकाने राहणार बंद .
चंद्रपूर दि.१६ऑगस्ट :
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सोमवारपासून १७ ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर येथे लॉक डाऊन प्रशासनाने घोषित केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस ग्रामपंचायतमध्ये रविवार दिनांक 16 ऑगस्ट पासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री 12 वाजे पर्यंत सर्व किराणा दुकान सर्व किरकोळ व ठोक विक्रेते सर व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने आस्थापना संपूर्णता बंद राहतील असे स्पष्ट केले .
बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार 17 ऑगस्ट पहाटेपासून 21 तारखेपर्यंत बल्लारपुर बामणी बंद राहणार आहे.
गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. 16 ऑगस्टपासून 22 तारखेपर्यंत लॉक डाऊन पाडण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात 21 व 22 तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा देण्यासाठी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील.