You are here
Home > गडचिरोली > धक्कादायक ;- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्ट लीला सोबतच रासलीला पण आल्या समोर,

धक्कादायक ;- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्ट लीला सोबतच रासलीला पण आल्या समोर,

सोनटक्के वनरक्षक असताना एका सहकारी वनरक्षक युवतीचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप व झाले होते निलंबन. एका जुन्या बातमीतून खुलासा.

कुरखेडा प्रतिनिधी :-

विद्यमान प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या वन विभागात केलेल्या भ्रष्ट लीला ह्या चव्हाट्यावर आल्यानंतर आता त्यांच्या रासलीला पण समोर आल्याने सुनील सोनटक्के बहुआयामी नतभ्रष्ट व्यक्तिमत्व असल्याचे शीद्ध होत आहे. मात्र आपले पाप लपविण्यासाठी संपादकाला पाहून घेण्याची अप्रत्यक्षपणे धमकी त्यांनी दिल्याची बाब चर्चेतून समोर आली आहे, पण विभागीय चौकशी आणि नवे मुख्य वन संरक्षक यांच्याकडे भुमीपुत्राची हाक न्यूज पोहचली असून सोनटक्के यांच्यावर कारवाई होणे निश्चित आहे हे विशेष.

एका जुन्या बातमी नुसार एकांच वनविभागात कार्यरत दोन वनरक्षक (विद्यमान प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सुनील सोनटक्के,व संजय रामगुंडेवार) यांनी एका वनमजुरासोबत मिळून सहकारी वनरक्षक असलेल्या एका युवतीचा विनयभंग केल्याचे प्रकरण काही वर्षापूर्वी उघडकीस आल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल नसल्याने व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणाबाबत प्रचंड गोपनियता बाळगून असल्याने हे प्रकरण नेमके विनयभंगाचे आहे, छेडछाडीचे आहे, की लैंगिक शोषणाचे? याची स्पष्टता समोर आलेली नव्हती .मात्र पीडित वनरक्षक युवती ने केलेल्या तक्रारीच्या आधारावर झालेल्या प्रशासकीय चौकशीत हे दोन्ही वनरक्षक व एक वनमजूर या प्रकरणात दोषी आढळल्याचे सांगण्यात आले होते.

सुनील सोनटके व संजय रामगुंडेवार यांना वनरक्षकांनी
गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी सेवेतून निलंबित केले होते. तर वनमजूर म्हणून कार्यरत हर्षवर्धनला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती वर्तमानपत्रात प्रशिद्ध झाली होती. या प्रकरणात तत्कालीन उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन यांनी प्रशासकीय चौकशी केली होती हे विशेष.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा