
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथील दारू माफियांच्या हल्ल्यात पोलिस हवालदार जखमी ? पोलीस अधीक्षकांनी दखल घेण्याची गरज.
वरोरा तालुका प्रतिनिधी :-
शेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या नेत्रुत्वात अवैध दारू विक्रेत्यावर एकीकडे वचक निर्माण झाला असताना दुसरीकडे दारू माफीयांनी मात्र पोलिसांनाच लक्ष केल्याने दारू माफीयांकडे एवढे धाडस येते कुठून ? हा गंभीर प्रश्न राजकीय सामजिक वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक.१८/०८/२०२० सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा.क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता सावरी बिडकर येथे गेले असता दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्यासोबत असलेल्या पो.हवा क्षिरसागर यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून सावरी बिडकर या गावामध्ये दारू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात स्वतः ठाणेदार बोरकुटे यांनी अवघ्या काही क्षणातच दारू माफियांच्या ह्या हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिले खरे पण अपुरा पोलिस स्टाफ आणि सावरी या गावातील अवैध दारू माफियांचा आक्रमक मोठा घोळका यामुळे ठाणेदारांना सुद्धा शांततेने प्रकरण हाताळणे भाग पडले पण महत्वाची बाब म्हणजे जिथे पोलिसांवरच दारू माफियांचा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेला हे दारू माफिया काय त्रास देत असेल ? असा प्रश्न उभा राहत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी तपास करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येवून पोलिसांवर हात ऊगारणाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांची किमान एक वर्ष जमानत होऊ नये असा कायदा किमान दारूबंदी जिल्ह्यात करण्यात यावा अशी मागणी दारूबंदी समर्थक करीत आहे.आता या प्रकरणात पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.